Self Help Group Fraud: राजुरा तालुक्यातील महिला बचत गटातील रकमेचा तब्बल २८ लाख ७० हजार रुपयांचा अपहार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, संबंधित आरोपी फरार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे..जवाहरनगर परिसरात मागील चार वर्षांपासून दोन महिला बचत गट कार्यरत होते. या दोन गटांमध्ये एकूण ४० सदस्यांचा सहभाग आहे. सदस्यांकडून दरमहा १ हजार ते २ हजार रुपये अशी नियमित बचत जमा केली जात होती. सुरुवातीला गटाचा आर्थिक व्यवहार सुरळीत सुरू होता..Tractor Scheme Fraud: ट्रॅक्टर योजनेत शेतकऱ्याची तीन लाखांची फसवणूक.गटातील सदस्यांना कर्जवाटप व वसुलीची जबाबदारी पंकज हारगुडे (वय ४०) यांच्याकडे सोपविण्यात आली होती. काळानुसार गटातील निधी वाढत गेला. कर्जवाटप व रकमेची मोजणी करण्याच्या बहाण्याने हारगुडे याने गटातील एकूण २८.७० लाख रुपये स्वतःकडे घेतले. मात्र त्यानंतर तो अचानक फरार झाला..Sugarcane Contractor Fraud: मुकादमांच्या फसवणुकीमुळे ऊस वाहतूकदार संकटात.त्यामुळे बचत गटातील महिलांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी साधना रणदिवे (वय ३६) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६ (२) अंतर्गत गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे..प्रकरणाचा आढावाएकूण अपहार २८,७०,०००बचत गटांची संख्या २एकूण सदस्य ४० महिलाकालावधी ४ वर्षेमासिक बचत १,००० ते २,०००आरोपी पंकज हारगुडे (४०)गुन्हा नोंद कलम ३१६ (२).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.