Pik Vyavasthapan: सध्या पाऊस कमी आहे. अनेक भागातील पिके वाळून चालली आहेत. अशा परिस्थितीत सोयाबीन, कपाशी आणि तूर ही महत्त्वाची पिके वाचवणे कठीण झाले आहे. परंतु संरक्षित सिंचन, पालाशयुक्त खतांच्या फवारण्या, आंतरमशागत, मुलस्थानी जलसंधारण, आणि आच्छादन या उपायांनी आपण पावसाच्या खंड काळात पिके वाचवू शकतो. .सोयाबीनवरील फवारण्यासोयाबीनचे पीक सध्या वाढीच्या, फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. अशा अवस्थेत पिकाला पाणी मिळाले नाही तर पीक वाळते आणि उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे पिके वाळताना दिसताच संरक्षित सिंचन द्यावे. संरक्षित सिंचन देणे शक्य नसेल तर पिकाला १३:०:४५ या विद्राव्य खताची १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असेल तर पिकाला ०:०:५० या खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी, असा सल्ला कसबे डिग्रज येथील कृषि संशोधन केंद्रातील सहायक प्राध्यापक डॉ. सचिन महाजन यांनी दिली आहे..Agriculture Management: पावसाच्या खंडामधील पीक व्यवस्थापनाचे नियोजन.कपाशीवरील फवारण्याकपाशीचे पीक सध्या पाते लागण्याच्या, फुलोरा आणि बोंडं लागण्याच्या अवस्थेत आहे. अशा अवस्थेत पाण्याचा ताण पडला की पीक वाळायला लागते. त्यामुळे फुलोरा अवस्थेत पिकाला १३:०:४५ या खताची २० ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी. परंतु पीक जर बोंडं लागण्याच्या अवस्थेत असेल पिकावर ०:०:५० या विद्राव्य खताची १० ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारणी करावी..Crop Management: कमी पाऊस, वाढीवर परिणाम; सोयाबीन, कापूस, तुरीसाठी व्यवस्थापन टिप्स.तुरीवरील फवारणी आणि केओलिनचा फायदातुरीचे पीक सध्या वाढीच्या आणि शेंडा खुडणीच्या अवस्थेत आहे. अशा अवस्थेत पिकामध्ये १३:०:४५ याची १० ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावी. शक्य असल्यास शेतकऱ्यांनी तिन्ही पिकांवर केओलिनची ६ टक्के म्हणजे ६० ग्रॅम प्रति लिटर पाणी अशी फवारणी करावी. यामुळे पिकावर पांढरा थर तयार होतो. या थरामुळे पानांवर असलेली छिद्रे बंद होतात, बाष्पोत्सर्जन कमी होते आणि पीक कमी पाण्यात तग धरते..पीक जगवण्यासाठीचे उपाययेत्या सप्टेंबरमध्येही पाऊस कमी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्याचे नियोजन आत्ताच करणे आवश्यक आहे. यामध्ये परतीच्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवावा. त्यासाठी मूलस्थानी जलसंधारणावर भर द्यावा. दोन ओळींमध्ये जास्त अंतर असलेल्या पिकांमध्ये सऱ्या पाडून घ्याव्यात. कपाशी आणि तूर या पिकांमध्ये आंतरमशागत करावी. कोळपणीमुळे मातीमधील भेगा बुजतात. त्यामुळे जमिनीतील बाष्पीभवन थांबते, ओलावा जास्त काळ टिकतो. माती भुसभुशीत होऊन मातीला आणि पिकांना ऑक्सिजन मिळतो. याशिवाय पिकाला शक्य असेल तर आच्छादन करावे. आच्छादनामुळे जमिनीतील ओलावा टिकतो तसेच तणांची वाढही रोखली जाते, असा सल्ला नांदेडच्या कापूस संशोधन केंद्रातील कृषिविद्यावेत्ता डॉ. अरविंद पांडागळे यांनी दिला आहे..पालाशयुक्त खतांची गरज का?वनस्पतीच्या पानांवरील छिद्र्यांमधून पाणी हवेमध्ये जाऊन त्याची वाफ होत असते, याला बाष्पोत्सर्जन म्हणतात. प्रत्येक झाडामध्ये ही क्रिया कायम चालू असते. परंतु मुळांमधून पिकाला पाणी मिळत नसेल तर बाष्पोत्सर्जनामुळे पिके वाळून जातात. पालाश हा पानांवरील बाष्पोत्सर्जन करणाऱ्या छिद्र्यांची उघडझाप करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. १३:०:४५ आणि ०:०:५० या दोन्ही खतांमध्ये पालाशचे प्रमाण जास्त आहे. त्याची फवारणी पिकावर केली की पानांवरील छिद्रे बंद होऊन त्यातून होणारी पाण्याची वाफ थांबते आणि पीक कमी पाण्यात तग धरुन उभे राहते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.