Native Seeds : नाशिक हवामान बदलामुळे शेतीसमोरील आव्हाने वाढत असताना मातीचे संवर्धन, गावरान वाणांची जपणूक आणि विषमुक्त शेतीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. माती आणि निसर्ग वाचवला, तरच पुढील पिढी सुरक्षित राहील, असा इशारा बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे यांनी दिला..मातोश्री निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या मातोश्री माळसादेवी, तसेच जगद्गुरू शांतिगिरी महाराज यांच्या मातोश्री फूलादेवी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ओझर मिग (ता. निफाड) येथील जनशांती धाममध्ये आयोजित ओम जगद्गुरू जनशांती धर्म सोहळ्यात आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त महिला शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम झाला. या वेळी राज्यभरातून आलेल्या हजारो महिला शेतकऱ्यांनी बियाणे संवर्धन आणि मातीची सुपीकता जपण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जगद्गुरू शांतिगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती..Ridge Planter: एकाच वेळी सरी, पेरणी आणि खत देणारे सरी वरंबा प्लांटर कसे काम करते?.राहीबाई म्हणाल्या, ‘‘हवामान बदलामुळे कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, तर कधी उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत स्थानिक हवामानाशी जुळवून घेणाऱ्या पारंपरिक बियाण्यांचे महत्त्व वाढते. काही गावरान वाण कमी पाण्यात येतात, तर काही प्रतिकूल परिस्थितीतही तग धरतात. त्यामुळे सर्व शेतात एकच वाण लावून निसर्गाशी जुगार खेळू नये.’.Paddy Sowing: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात पेरणी सुरू.प्रत्येक गावात गावरान बियाण्यांची बँक उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विषमुक्त भाजीपाला आणि देशी अन्नधान्याचा आहारात समावेश करावा, तसेच नव्या पिढीला जंक फूडपासून दूर ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी संगमनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी भारतीय संस्कृती आणि शेती या विषयांवर उपस्थितांशी संवाद साधला. रासायनिक शेतीमुळे मातीचे आणि मानवी आरोग्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक घरात परसबाग असावी, असे मत व्यक्त करण्यात आले. वणव्यांमुळे पक्षी, प्राणी आणि वनस्पतींचे मोठे नुकसान होत असल्याबद्दल राहीबाईंनी चिंता व्यक्त केली. सेंद्रिय शेतीच्या प्रक्षेत्रात देशी बियाण्यांची लागवड करून सेंद्रिय शेतीची चळवळ घराघरांत पोहोचविण्याचा संकल्पही या वेळी करण्यात आला..प्रत्येकाचे ताट विषमुक्त व्हावे, हाच माझ्यासाठी मोठा पुरस्कार‘‘मला मिळालेले पुरस्कार महत्त्वाचे आहेत; मात्र देशातील प्रत्येक नागरिकाचे ताट आणि काळी माती विषमुक्त होईल, तोच माझ्यासाठी खरा मोठा पुरस्कार असेल,’’ असे राहीबाई पोपेरे यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.