Ahilyanagar News: नेवासे तालुक्यातील सौंदाळे येथे लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी विविध प्रश्नांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात संपूर्ण ग्रामस्थ सहभागी झाले आहे. या वेळी सर्व मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे..दरम्यान, नायब तहसीलदार सुदर्शन दुर्योधन व मंडलाधिकारी सरिता मुंडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र तोडगा निघाला नसल्याने उपोषण सुरूच होते. हे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे..Sarpanch Protest : गाव कारभाऱ्यांचं मानधन वाढणार ; सरपंच परिषदेच्या आंदोलनाला यश.लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी सौंदाळे येथील महादेव मंदिर देवस्थान सभागृहात सोमवारी (ता. २३) सकाळपासून सुरू केलेले बेमुदत उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. सरपंच आरगडे यांनी उपोषणाबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात सौंदाळे येथील २२० केव्ही सबटेशन येथे आउट सोर्सिंगमध्ये जागा देताना ग्रामसभा ठरावामध्ये नमूद केल्याप्रमाणे गावातीलच सुशिक्षित बेरोजगार तरुण तातडीने घेतले पाहिजे. .Sarpanch Empowers: सरपंचांना २५ लाखांपर्यंतची विकास कामे करण्याचे अधिकार, प्रत्येक सदस्याला ५० हजार मिळणार, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा.सौंदाळे गावातील सर्व शिवरस्ते मोजणी करून खुले व अतिक्रमण मुक्त करावेत. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत राहिलेले अपूर्ण कामे पूर्ण करा. महावितरण ३३ केव्हीच्या सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व फिडरवर सिंगल फेज पूर्ण दाबाने दिलीच पाहिजे. .सौंदाळे ग्रामपंचायतीने आकारलेल्या ३३ केव्हीच्या पोल डीपी कर वसुलीच्या कारवाईचा तहसीलदार यांनी आपल्याकडे प्रस्ताव पाठवावा. रांजणगाव (ता. नेवासा) येथील गौण खनिज वाहतुकीमुळे सौंदाळे गावातील रस्ते खराब झाल्याने त्यांनी शासनाकडे भरलेल्या करातून गावातील रस्ते करण्यासाठी निधी मिळाला पाहिजे. गावात नवीन रेशनकार्ड ऑनलाइन करणे व त्यांना धान्य पुरवठा करण्यासाठी तातडीने कॅम्प घ्या..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.