Ahilyanagar News: जाती-पातीमुळे समाजातील भेदभाव आणि असमानता दूर करण्याच्या हेतूने सौदाळा (ता. नेवासा) गावाने जातमुक्तीची घोषणा केली आहे. गावांतील विविध जाती-धर्माच्या पंधरा लोकांनी एकत्र येऊन रक्तदान करत ग्रामसभेत ठराव करून जातीमुक्त गावासाठी एक पाऊल पुढे टाकले असून, असा निर्णय घेणारे सौंदाळा हे राज्यातील पहिले गाव ठरले आहे..सौदाळा गावातील नागरिकांनी सरपंच शरद आरगडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या ग्रामसभेत ‘जातमुक्त गाव’ असल्याबाबत ठराव घेऊन घोषणा केली. या उपक्रमासाठी प्रमोद झिंजाड यांनी केलेल्या आवाहनाला गावाने प्रतिसाद दिला. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ अंतर्गत ग्रामसभेला गावाच्या सामाजिक, शैक्षणिक व नैतिक विकासासंबंधी तसेच सार्वजनिक हिताच्या विषयांवर ठराव करण्याचा अधिकार आहे..Rural Development: लोकसहभागातूनच खऱ्या अर्थाने विकास साधता येतो.त्या अधिकाराचा वापर करून ग्रामपातळीवर सामाजिक एकात्मता व समता प्रस्थापित करण्यासाठी आपले गाव ‘जातमुक्त गाव’ म्हणून घोषित करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केल्यावर सरपंच शरद आरगडे यांनी गाव जातमुक्तीचा ठराव मांडला. बाबासाहेब बोधक यांनी अनुमोदन दिल्यानंतर ठराव मंजूर करण्यात आला..Rural Healthcare Development: आरोग्य सेवेला बळकटी .ग्रामसभेतील ठरावगावात जात, धर्म, पंथ, वंश याबाबत भेदभाव केला जाणार नाही.सार्वजनिक ठिकाणे, शासकीय योजना, ग्रामपंचायत सेवा, सामाजिक-धार्मिक कार्यक्रम, विवाह, सण-उत्सवात जातीभेद पूर्णपणे बंद, जातनिहाय प्रथा, भेदभाव, बहिष्कार, अस्पृश्यता, सामाजिक अन्याय आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाणार.पाणीपुरवठा, मंदिरे, स्मशानभूमी, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय सर्वांसाठी खुली राहणार.जातीय सलोखा, समता व बंधुता याबाबत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतीलसोशल मीडियावर जाती भेदभावाबाबत संदेश करणार नाही.शासनाच्या समता व सामाजिक न्याय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार..सौदाळा गाव कायम सामाजिक सलोखा राखत विविध उपक्रम राबवत आहे. गावात कोणी शिवी दिल्यास दंड, विद्यार्थ्यांच्या हितासाठी सायंकाळी दोन तास मोबाईल वापरास बंदी, अल्पसंख्याक, गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत असे वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. आता आम्ही गाव जातमुक्त करण्याची घोषणा केली आहे.शरद आरगडे, सरपंच, सौंदाळा ता. नेवासा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.