Kharif Crops Flourishing : विस्कळीत पावसामुळे चिंतेत असलेल्या शेतकरी वर्गाला जुलैत समाधानकारक पावसाने मोठा दिलासा दिला आहे. मागील पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतामध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाला असुन खरीप पिकांची वाढ जोमाने होत आहे. .समाधानकारक पावसाने शेतीशिवार बहरले आहे. त्यामुळे शेतकरी औषध फवारणी व खत व्यवस्थापनात व्यस्त असल्याचे चित्र आहे. दरम्यान पावसामुळे निफाड तालुक्यात आता पर्यत ९४ टक्के पेरणी झाली असुन उर्वरीत क्षेत्रावर येत्या आठवड्यात पेरणी होईल,असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे..Farm Irrigation: पावसाच्या दडीमुळे पिकांना तुषार सिंचनाचा आधार.यंदा मॉन्सूनची सुरवात काहीशी निराशाजनक झाली. पाऊस वेळवर न आल्याने निफाड तालुक्यात खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या मका, सोयाबीनच्या पेरणीचा नांगर रुतला होता. शेतकऱ्यांनी अल्प पावसावर मोठ्या धाडसाने पेरणी केली. .Dry Spell After Sowing: पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास काय कराल?.जुलैच्या मध्यापर्यंत पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट होते. मात्र, गेली दहा दिवसापासून वरूणराजा बरसल्याने शेतीपिकांना जीवदान मिळाले आहे. पावसाची तूट भरून निघाली. पिके चांगलीच तरारली असल्याचे चित्र शेतशिवारात दिसत आहे..पंधरा-वीस दिवसापूर्वी पेरणी झालेल्या क्षेत्रातील पिके आता रोपट्याच्या अवस्थेत आहे. पिकांतील तणाची काढणी सुरू आहे. शिवाय युरिया, डीएपी व इतर संतुलीत खतांची मात्रा पिकांना दिली जात आहे. शेतकऱ्यांनी देखील हवामानाचा अंदाज घेऊन खत व्यवस्थापन, किड-रोग नियंत्रण आणि आंतरमशागत करण्याचा सल्ला दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.