Diesel Shortage Maharashtra: मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची पेट्रोल पंपावर झुंबड उडताना दिसत आहे. शेतकऱ्यांना कॅन घेऊन १२ तास रांगेत उभे राहावे लागत असल्याची परिस्थिती आहे. अशावेळी परभणीत काही ठिकाणी सातबारा दाखवून डिझेल घेण्याची अट घालण्यात आली आहे. या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकाराची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांकडे डिझेलसाठी सातबारा मागितला तर कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे..डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची मशागतीचे कामे खोळंबली आहेत. अनेक पंपांवर कॅन घेऊन शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी पंपांवर साठा संपल्याचे फलक लावण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी सातबारा दाखवल्याशिवाय डिझेल दिले जात नसल्याची माहिती समोर आली आहे. .Solapur Diesel Shortage: पेट्रोल-डिझेल टंचाईमुळे ग्रामीण भागातील मशागतीची कामे खोळंबली.या पार्श्वभूमीवर बोलताना कृषिमंत्री भरणे यांनी म्हटले आहे की, हे निश्चित प्रकारे चुकीचे आहे. याबाबतीत मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात कुठेही पेट्रोल- डिझेलची टंचाई नाही. विनाकारण चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. इंधनाचा खप २० टक्के वाढलेला आहे. लोक घाबरून डिझेलसाठी पंपांवर रांगा लावत आहेत. कालच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा साठा व्यवस्थित आहे. .Nanded Diesel Shortage: नांदेडमध्ये पेट्रोल-डिझेल उपलब्धतेबाबत संभ्रम.शेतकऱ्यांसाठी डिझेलचा राखीव साठा ठेवण्याची गरज नाही. इंधनाचा साठा पुरेसा आहे. पण चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. पंपांवर अजिबात रांगा लावू नयेत. प्रत्येकाला डिझेल, पेट्रोल मिळेल, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले आहे..'शेतकऱ्यांकडे डिझेलसाठी सातबारा मागितला तर कारवाई'जर कोणत्याही पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांकडे सातबारा मागितला जात असेल तर त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कारवाई केली जाईल, असे इशाराही त्यांनी दिला आहे.खतांच्या 'लिकिंग'बाबत बोलताना ते म्हणाले की, दुकानदाराने केवळ अनुदानित खते ठेवायची. विनाअनुदानित कृषी निविष्ठा ठेवू नयेत. यामुळे खतांच्या लिंकिंगचा विषय येणार नाही. .शेतकऱ्यांना प्राधान्याने डिझेल उपलब्ध करुन द्यावे, अजित नवलेंची मागणी मुख्यमंत्र्यांनी खरीप हंगामाच्या तयारीसाठी बैठक घेतली असली तरी ग्रामीण पातळीवर याबाबत पुरेशा प्रमाणात गांभीर्य प्रशासनाला आलेले नाही, हेच यातून दिसत असल्याची टीका अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केली आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब अत्यंत गांभीर्याने घ्यावी. कुठेही शेतकऱ्यांना डिझेलसाठी सातबारा आणि कोणतीही अट लावू नये. तसेच शेतकऱ्यांना प्राधान्याने शेती अवजारांसाठी डिझेल उपलब्ध करुन देण्याची तसदी संपूर्ण महाराष्ट्राभर जिल्हाधिकारी आणि पुरवठा अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.