Satara News: जगातील सर्वांत बुटकी जिवंत पाळीव म्हैस म्हणून सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मलवडीच्या ‘राधा’ची ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. या ठेंगण्या ‘राधा’ला पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली असून, प्रत्येक प्रदर्शनात ती गर्दी खेचत आहे..मलवडीतील शेतकरी व पशुपालक त्रिंबक बोराटे यांच्या घरच्याच मुऱ्हा म्हशीच्या पोटी १९ जून २०२२ रोजी ‘राधा’चा जन्म झाला. ‘राधा’ दोन-अडीच वर्षांची झाल्यावर तिच्या उंचीतील बदल त्रिंबक बोराटे यांच्या लक्षात आला. त्यानंतर श्री. बोराटे यांचा कृषी पदवीधर मुलगा अनिकेत याने ‘राधा’ला कृषी प्रदर्शनात सहभागी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सुरुवातीला कोणीच त्याला प्रतिसाद दिला नाही..Pandharpuri Buffalo : पाटील करताहेत जातिवंत पंढरपुरी म्हशींचे संवर्धन .२१ डिसेंबर २०२४ ला सोलापूर येथील सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात पहिल्यांदा ‘राधा’ने सहभाग घेतला. अन् ‘राधा’चा सर्वत्र बोलबाला सुरू झाला. त्यानंतर पुसेगावचे सेवागिरी कृषी प्रदर्शन व कर्नाटकातील निपाणी येथील कृषी प्रदर्शनासह एकूण १३ कृषी प्रदर्शनात खास आकर्षण म्हणून ‘राधा’ला निमंत्रित करण्यात आले..Buffalo Farming: म्हैसपालनात स्वच्छता, चारा, आरोग्यावर भर.२४ जानेवारी २०२५ रोजी ‘राधा’ची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली. परभणी येथील कृषी प्रदर्शनानंतर अनिकेत याने ‘राधा’च्या गिनेस वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न सुरू केले. २८ ऑक्टोबरला ‘राधा’ची जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. यात पशुधन विकास अधिकारी डॉ. शरद थोरात यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे अनिकेत सांगतात..आमची ‘राधा’ प्रत्येक कृषी प्रदर्शनात सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून, सामान्य शेतकऱ्यांसह अनेक मान्यवर व तज्ज्ञांच्या आकर्षणाची ती केंद्रबिंदू ठरत आहे. ‘राधा’ची नोंद ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. यापुढे आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ‘राधा’ला सहभागी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.अनिकेत बोराटे, ‘राधा’ म्हशीचे मालक संपर्क : ९१४५६०७५०१.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.