Local Elections: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर सत्तासंघर्षात अखेर भाजपने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या आघाडीला धोबीपछाड देत भाजपने पहिल्यांदाच सातारा जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवला. अध्यक्षपदी भाजपच्या डॉ. प्रिया शिंदे, तर उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड झाली असून, केवळ तीन मतांच्या निसटत्या फरकाने भाजपने ही सत्ता खेचून आणली आहे..जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने शिवसेनेला बाजूला ठेवत स्वबळावर सत्ता मिळविण्याचा निर्धार केला होता. दुसरीकडे, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने काही तालुक्यांत एकत्र येत निवडणूक लढवली होती. प्रत्यक्ष निकालानंतर ६५ गटांच्या या सभागृहात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. भाजपला २७ जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादीला २० आणि शिवसेनेला १५ जागा मिळाल्या होत्या. याशिवाय काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना व अपक्षाकडे प्रत्येकी एक जागा असल्याने सत्तेत येण्यासाठी पुरेसे पाठबळ होते..Zilla Parishad President: धाराशिव ‘झेडपी’ अध्यक्ष, सभापती निवडीचा मार्ग मोकळा.मात्र भाजपकडे बहुमतासाठी ३३ जागांची आवश्यकता असताना भाजपकडे स्वतःचे पुरेसे संख्याबळ नव्हते. या राजकीय नाट्यमय घडामोडीत भाजपने राजकीय गणिते जुळवत राष्ट्रवादी-शिवसेनेचे मनसुबे उधळून लावत सत्ता ताब्यात घेतली आहे. .Solapur Zilla Parishad: ‘झेडपी’ अध्यक्षपदासाठी बार्शीची सरशी.शुक्रवारी निवडणूक प्रक्रियेच्या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासूनच जिल्हा परिषद परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. साडेअकरा वाजता भाजपचे सदस्य ट्रॅव्हल्सने दाखल झाले, तर सव्वा बाराच्या सुमारास शिवसेना व राष्ट्रवादीचे सदस्य एकत्रितपणे सभागृहात आले. प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत हात उंचावून मतदान घेण्यात आले. .यामध्ये भाजपच्या बाजूने ३३ सदस्यांनी कौल दिला, तर राष्ट्रवादी-शिवसेना युतीला ३० मतांवर समाधान मानावे लागले. अवघ्या तीन मतांच्या फरकाने भाजपने जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करून जिल्ह्यात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे..सभागृहात येण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांना अपहरणाच्या गुन्ह्यात ताब्यात घेतल्याने बहुमतासाठी असलेला आकडा कमी झाला. तसेच राष्ट्रवादी व शिवसेनेचे काही मते भाजपच्या बाजूने गेल्याचे बोलले जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.