Farm Irrigation: केंद्र व राज्य शासनाच्या ‘पीएम-कुसुम (बी)’ आणि ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनांमुळे जिल्ह्यातील सिंचन खर्च कमी होऊ लागला आहे. या योजनेतून जिल्ह्यात सात हजारांहून अधिक शेतात सौरपंप कार्यान्वित झाले आहेत. यामुळे डिझेल व विजेचा वाढता भुर्दंड आणि अनियमित वीजपुरवठा यापासून सुटका होण्यास मदत झाली आहे..‘पीएम-कुसुम (बी)’ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ४,०८८ शेतकऱ्यांनी रक्कम भरली असून त्यापैकी ४,०३४ शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषीपंप यशस्वीपणे बसवण्यात आले आहेत. तसेच, सध्या सुरू असलेल्या ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेत ५,७४७ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असून त्यापैकी २,८५१ शेतकऱ्यांच्या शेतात सौर पंप कार्यान्वित झाले आहेत..Kusum Solar Pump Complaints: कुसुम सौरपंपांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी; लाभार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन.सौर कृषीपंपामुळे डिझेलचा खर्च आणि विजेच्या बिलाचा भार पूर्णपणे संपल्यामुळे शेती उत्पादनाचा निव्वळ नफा वाढण्यास मदत होत आहे. यातून वाचलेली रक्कम शेतकरी पीक उत्पादन वाढवण्यासाठी, शेतीच्या आधुनिकीकरणासाठी तसेच जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरत असल्याने ग्रामीण भागात आर्थिक शिस्त निर्माण होत आहे..Agriculture Solar Pump: आठ महिन्यांपासून सौर कृषिपंपांची प्रतीक्षा.या योजनांतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या क्षेत्रानुसार ३, ५ व ७.५ अश्वशक्ती क्षमतेचे सौर पंप अनुदानावर दिले जात आहेत. .यात सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना १० टक्के, तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५ टक्के हिस्सा भरावा लागतो आणि उर्वरित खर्च शासन उचलते. दिवसा नियमित सिंचन शक्य होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.