Satara News: कण्हेरखेड (ता. कोरेगाव) विकास सोसायटीचे सचिव दयानंद खाडगे यांना मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी सातारा जिल्हा गट सचिव संघटनेने पुकारलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनात जिल्ह्यातील ९३० सोसायट्यांचे ८५० गट सचिव व सुमारे २५० लिपिक उतरलेले असल्यामुळे गुरुवारी (ता. १२) तिसऱ्या दिवशीही सेवा सोसायट्यांचे कामकाज ठप्प झाले आहे. परिणामी, शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जदार सभासद याद्यांचे काम रेंगाळले आहे..कण्हेरखेड सोसायटीचे सचिव दयानंद खाडगे यांनी कर्ज वसुली केल्याचा राग मनात धरून सेवा सोसायटीचा एक सभासद, त्यांचा मुलगा आणि त्यांच्या एका मित्राने दोन मार्चला मारहाण करून जखमी केले होते. त्यानंतर या मारहाणीची तक्रार पाच मार्चला कोरेगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. मात्र, ही तक्रार गंभीर स्वरूपाची घेऊन मारहाण करून जखमी करणाऱ्यांना अटक न झाल्याने कोरेगाव तालुका गट सचिव संघटनेने पाच मार्चला एक दिवस काम बंद आंदोलन केले,.Farmer Loan Waiver: अकोला जिल्हा बँकेच्या ६१ हजार खातेदारांना लाभ .तर सातारा जिल्हा गट सचिव संघटनेने याप्रकरणी मारहाण करणाऱ्यांना दोन दिवसांत अटक करावी, अन्यथा सात मार्चपासून जिल्ह्यातील सर्व गट सचिव बेमुदत काम बंद आंदोलनात उतरतील, असा इशारा पोलिस अधीक्षक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व तालुकास्तरीय सहाय्यक निबंधकांना दिलेला होता..Farmer loan waiver: आश्वासन कर्जमुक्तीचे; मात्र अटी-शर्थींसह शेतकऱ्यांची फसवणूक - उद्धव ठाकरे.मात्र, त्यानंतरही काही कारवाई न झाल्याने कालपासून जिल्ह्यातील ९३० विकास सेवा सोसायट्यांचे ८५० सचिव आणि सुमारे २५० लिपिक बेमुदत काम बंद आंदोलनात उतरले आहेत. त्यामुळे सर्व सोसायट्यांचे कामकाज ठप्प झाले आहे..महाराष्ट्र शासनाच्या लोकसेवकांच्या यादीत आम्हा गट सचिवांचा समावेश आहे. तसा शासन निर्णयही आहे. त्यामुळे कन्हेरखेड सचिव मारहाणप्रकरणी ‘शासकीय कामामध्ये अडथळा’ या कलमाखाली गुन्हा दाखल करावा, तसेच मारहाण करणाऱ्यांना अटक करावी अशी आमची मागणी आहे. ही मागणी मान्य झाल्याशिवाय आम्ही काम बंद आंदोलन मागे घेणार नाही-संदीप कदम, अध्यक्ष, सातारा जिल्हा गट सचिव संघटना..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.