Latest Monsoon Update: सातारा जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये रविवारी (ता.२८) दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटात दमदार पावसाने हजेरी लावली. सातारा, कोरेगाव, खटाव, वाई, आणि महाबळेश्वर तालुक्यांमध्ये झालेल्या या दमदार पावसामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे खोळंबलेल्या शेतीच्या कामांना वेग येणार आहे. जिल्ह्यात २४ तासात १७.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे..सातारा शहरात रविवारी दुपारनंतर अचानक पावसाचा जोर वाढला. तालुक्यातील शेंद्रे, बोरगाव, नागठाणे परिसरात पावसाच्या दमदार सरी कोसळल्या आहेत. रात्रीही तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होता..Satara Rain Update: सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी.उत्तर खटाव आणि पुसेगाव परिसरातही पावसाने जोरदार बॅटिंग केली. पुसेगाव, नेर, बुध, वर्धनगड, विसापूर, आणि वर्धनगड पट्ट्यात मुसळधार पाऊस झाल्याने वेण्णा नदीला पूर आला. नदीसह ओढे आणि बंधारे ओसंडून वाहू लागले. अद्याप काही कोरडवाहू भागांत पावसाची प्रतीक्षा कायम आहे..Pune Monsoon Rain: पुणे जिल्ह्यात विविध भागांत मॉन्सूनचे दमदार पुनरागमन.तसेच मायाणी, कलेढोण, पांगरी, ढोकळवाडी, आणि कऱ्हाड तालुक्यातील विंग परिसरामध्येही तासाभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी झाले. गेल्या अनेक महिन्यांपासून विहिरींची आणि कूपनलिकांची घटलेली पाणीपातळी सुधारण्यास यामुळे मदत होणार आहे..पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, संपूर्ण जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास रखडलेल्या पेरण्यांना लवकरच सुरुवात होणार आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला..नवजा येेथे ८६ मिमी पाऊसधरण क्षेत्रातील कोयना ७७, नवजा ८६, महाबळेश्वर ६२ मिलिमीटर पाऊस झाला असून धरणात प्रति सेकंद २५५६ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणात सोमवारी सकाळी आठपर्यंत ९.१२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.