Modern Farming : सातारा शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनांतून अनुदानावर अवजारे उपलब्ध होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने ऑफलाइन पद्धतीने १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविले आहेत. यामध्ये कडबाकुट्टी, ताडपत्री, बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप, पाच व साडे सात एचपी विद्युतपंप, पीव्हीसी पाइप, कृषी यांत्रिकीकरणांतर्गत नांगर, टोकण यंत्र, कोळपे, पॉवर विडर, कीड सापळे यांचा समावेश आहे. .या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी पंचायत समितीच्या स्तरावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. लक्ष्यांकापेक्षा जास्त अर्ज आल्यानंतर जिल्हा परिषद स्तरावर समितीद्वारे अर्जदारांची निवड केली जाणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग व महिला शेतकऱ्यांना शासनाच्या प्रचलित नियमानुसार काही अवजारे राखीव असतील, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती लता कर्णे यांनी दिली..Kharif Season: साताऱ्यात शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शनासाठी कृषी विभाग बांधावर.शेतकऱ्यांना अनुदानावर शेतीपूरक अवजारे उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून ज्या त्या पंचायत समितीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे..Farmers Study Tour: शेतकऱ्यांना युरोप, चीनमधील आधुनिक शेती अनुभवता येणार.या योजनेत निवड होण्यासाठी शेतकऱ्यांना तांत्रिक निकष, दर्जा या बाबींसाठी अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कडबाकुटी यंत्र किमतीच्या ५० टक्के इतके अनुदान असेल. .तसेच ताडपत्री, बॅटरी ऑपरेटेड स्प्रेपंप, तसेच पाच ते साडेसात एचपी विद्युतपंप संच, तीन एचपी विद्युत पंपसंच, पाइपलाइन करण्यासाठी पीव्हीसी पाइप (जास्तीत जास्त ३० पाइप), कृषी यांत्रिकीकरणांतर्गत पल्टी नांगर, पाचट कुटी यंत्र, खोडवा तासणी यंत्र, बियाणे टोकण यंत्र, पॉवर विडर, सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी ताग व धैंचा बियाणेवाटप, कोळपी, कीड नियंत्रण सापळे यांचा समावेश आहे. यामध्ये अवजारानुसार ४० ते ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान असेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.