Weather Update: अनेक महिन्यांच्या असह्य उकाड्यानंतर आणि पावसाळा सुरू होऊनही दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर रविवारी दुपारी हजेरी लावली. पावसाळा सुरू होऊनही निरभ्र आकाश पाहून चिंतेत पडलेल्या शेतकऱ्यांना आकाशात झालेली ढगांची गर्दी आणि थंड मोसमी वाऱ्याची झुळूक जाणवू लागली. जिल्ह्यातील तीन-चार तालुक्यांत बरसलेल्या या आनंदसरींनी काहीसा दिलासा दिला आहे..सातारा शहरासह तालुक्याच्या विविध भागात रविवारी दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे नागरिक तसेच व्यापाऱ्यांची काही काळ धांदल उडाली. दुपारपासूनच शहर परिसरातील आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली होती आणि ढगांमुळे वातावरणातील उकाडा वाढला होता. .Satara Rain Update : सातारा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी.दुपारी तीननंतर शहराच्या काही भागात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. यानंतर मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा सुटला. सायंकाळी पाचनंतर पुन्हा एकदा शहरासह परिसरात हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली असून रात्री उशिरापर्यंत शहरासह परिसरात कमी-अधिक प्रमाणात पाऊस कोसळतच होता. तालुक्यातही काही ठिकाणी पाऊस झाला आहे. पाटण तालुक्यातही पावसाने रविवारी दुपारनंतर कुठे तुरळक हजेरी लावली, तर कुठे संपूर्ण परिसराला झोडपून काढले. यावर्षीच्या मॉन्सून आगमनाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना झालेल्या पावसाने दिलासा दिला आहे..Satara Rain Update : साताऱ्यातील सहा धरणांतून ५८ हजार क्युसेकने विसर्ग.मोरगिरी आणि मोरणा विभागात दुपारी साडेतीनच्या सुमारास विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने संपूर्ण भागाला झोडपून काढले. सध्या मोरणा-गुरेघर धरणात ६० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे आता पिण्याच्या पाण्याची चिंता कमी झाली आहे. तालुक्यातील इतर धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठला असतानाच सर्वत्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती. .शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असतानाच मॉन्सूनच्या सरींची अत्यंत गरज होती. तालुक्यात काही ठिकाणी दमदार, तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरात रविवारी संध्याकाळी वातावरणात अचानक बदल झाला. आकाशात दाट ढगांची गर्दी, गार वाऱ्याच्या झुळका, परिसरभर पसरलेले धुके आणि ढगांच्या गडगडाटामुळे निसर्गात सुखद बदल जाणवू लागला. या आल्हाददायक वातावरणामुळे महाबळेश्वरकरांसह पर्यटकांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील विविध पर्यटनस्थळांवर दाट धुक्याची चादर पसरल्याने निसर्गसौंदर्यात भर पडली असून, पर्यटकांनी या मनमोहक वातावरणाचा मनमुराद आनंद घेतला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.