Agriculture Market Slowdown Due: पावसाअभावी केवळ शेतीच नव्हे, तर त्यावर अवलंबून असलेली ग्रामीण बाजारपेठही आर्थिक अडचणीत सापडली आहे. सातारा जिल्ह्यात सुमारे ५५ हजार मेट्रिक टन खताचा साठा विक्रीअभावी पडून असून, खते, बियाणे आणि औषधांच्या कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीला खीळ बसली आहे. परिणामी जिल्ह्यातील सुमारे ४०० खत विक्रेत्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे..शेतकरी पेरणीसाठी खरेदीसाठी येतील, या अपेक्षेने अनेक विक्रेत्यांनी बँका व खासगी वित्तसंस्थांकडून कर्ज घेऊन लाखो रुपयांचा माल साठवून ठेवला होता. मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी खरेदी टाळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रे, खत विक्रेते आणि बियाणे दुकानदारांकडे दोन महिन्यांहून अधिक काळापासून खते, बियाणे आणि कीटकनाशकांचा मोठा साठा पडून आहे..Monsoon Delayed Impact: पावसाअभावी पर्यटन मंदावले.पेरणीसाठी आवश्यक ओलावा नसल्याने शेतकरी आर्थिक जोखीम घेण्यास तयार नाहीत. दुसरीकडे विक्रेत्यांवर कर्जाचे हप्ते आणि व्याजाचा बोजा वाढत असताना विक्री ठप्प झाल्याने त्यांचे भांडवल अडकून पडले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली असून, शेतकऱ्यांप्रमाणेच त्यांच्याही नजरा आता पावसाकडे लागल्या आहेत..अन्य व्यवसायांनाही फटकाग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या खरीप हंगामावर अनेक लहान-मोठे व्यवसाय अवलंबून असतात. पेरणीच्या काळात खते, बियाणे आणि औषधांच्या खरेदीमुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते. कृषी सेवा केंद्रे, वाहतूकदार, मजूर तसेच किरकोळ दुकानदारांनाही त्याचा फायदा होतो. मात्र यंदा पावसाअभावी हे संपूर्ण अर्थचक्र मंदावले आहे..खरिपावरच वर्षभराची आर्थिक गणितेजिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन खरीप हंगामावर अवलंबून असते. खरिपातील उत्पन्नावर पुढील शेतीची गुंतवणूक, कुटुंबाचा खर्च, मुलांचे शिक्षण आणि कर्जफेड यांची व्यवस्था केली जाते. सध्या पेरणी लांबल्याने संपूर्ण पीक नियोजन विस्कळित होण्याची भीती व्यक्त होत आहे..Monsoon Delay Issue: पावसाच्या विलंबामुळे सिंचनाच्या गरजेत वाढ; शेतकरी चिंतेत.सातारा जिल्ह्यातील खताचा शिल्लक साठा (टनांमध्ये)युरिया – १२,०६०डीएपी – ५,४७९एमओपी – ५,७३५एनपीके – २४,६२५एसएसपी – ७,६६८एकूण साठा – ५५,५६७.जिल्ह्यातील खरीप पेरणीचे क्षेत्रसोयाबीन – ९३ हजार हेक्टरभात – ४७ हजार हेक्टरबाजरी – ५० हजार हेक्टरमका – १३,१५२ हेक्टरमूग – १० हजार हेक्टर.घेवडा-वाटाणा – ३७ हजार हेक्टरभुईमूग – ३१ हजार हेक्टरऊस – १,१४,७२५ हेक्टरइतर पिके – १६,७१९ हेक्टरएकूण क्षेत्र – ४,१२,६३६ हेक्टर.जिल्ह्यातील सुमारे ४०० विक्रेत्यांनी कोट्यवधी रुपयांचा माल साठवून ठेवला आहे. मात्र यंदा पाऊसच सुरू न झाल्याने कर्ज काढून खरेदी केलेला माल दीड ते दोन महिन्यांपासून पडून आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.- प्रशांत पाटील, उपाध्यक्ष, सातारा जिल्हा खत विक्रेता संघटना.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.