Rural Banking: बदलते हवामान, प्राप्त परिस्थितीशी दोन हात करत जिल्ह्यातील शेतकरी शेतीत विविध प्रयोग करत भरघोस उत्पादन घेत आहेत. ‘एआय’सारख्या सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या पाठीशी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उभी असून, शेतकऱ्यांनीही बँकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे यांनी केले..मानेगाव (ता. पाटण) येथील प्रगतशील शेतकरी अधिकराव माने व विजय माने या पितापुत्रांनी माळरानावर फुलविलेल्या सफरचंदाच्या बागेला सरकाळे यांनी भेट देऊन तिथे उपस्थित विविध गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, ज्येष्ठ नेते हिंदूराव पाटील, पाटण तालुका भाजप अध्यक्ष गणेश यादव आदी उपस्थित होते..Onion Farmers Support: कांद्याच्या भावात घसरण, उपाययोजनांसाठी सरकारकडून समिती गठित.अधिकराव माने यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी तसेच शेतीसमोरील आव्हाने याची माहिती दिली. या वेळी सरकाळे म्हणाले, ‘‘आधुनिक शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) सक्षम वापर करण्यासाठी बँक शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल. तालुक्यात फळबागांवर आधारित पर्यटन, फळ प्रक्रिया उद्योग याला भविष्यात चांगले दिवस येणार आहेत.’’.Livestock Farmers Support: पशुपालकांना व्याजदरात चार टक्के सवलत.सफरचंद लागवडीतील तांत्रिक बाबी, हवामानाशी जुळवून घेतलेली शेती पद्धती, उत्पादन क्षमता आणि बाजारपेठेतील संधी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली..पाटणकर यांनी अधिकराव माने व विजय माने यांच्या या धाडसी आणि नावीन्यपूर्ण प्रयोगाचे कौतुक करत, अशा प्रकारचे प्रयोग शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील, असे सांगितले. या वेळी बँकेचे आधिकारी, कर्मचारी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.