Nashik News: कांदा उत्पादक शेतकरी अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांचा सामना करत आहेत. तर केंद्राच्या धोरणांमुळे उत्पादन खर्च देखील निघत नाही. याच मुद्द्यावर मोरेनगर (ता. सटाणा) येथील कांदा उत्पादक शेतकरी व आपल्या कुंचल्यातून शेतीप्रश्न मांडणारे व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी कांदा लागवड ते काढणीपश्चात साठवणूक अशी कांदा पीक संबंधित कामकाजाचे टप्पे गणपती बाप्पासमोर देखाव्यातून मांडले आहेत..‘लढा कांदा शेतीचा’ या संकल्पनेतून कांदा शेती आणि आस्मानी संकटांचा देखावा साकारला आहे. गेल्या काही वर्षांत वाढलेला उत्पादन खर्च, मजूर टंचाई असे प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेत..Ganpati Festival 2025: सिंधुदुर्गात गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीची लगबग.अशा प्रतिकूल परिस्थितीत कांदा उत्पादन घेऊनही शेतकऱ्यांना अपेक्षित दरासाठी संघर्ष करण्याची वेळ सातत्याने येत आहे. देशात ग्राहकांचा विचार होतो पण कांदा उत्पादकांचा विचार होत नाही, अशी परिस्थिती आहे..Onion Payment Delay: कांद्याच्या पैशांसाठी सणासुदीला वणवण.याच पार्श्वभूमीवर गल्लीपासून दिल्लीपर्यंत कांदा उत्पादक शेतकरी, शेतकरी संघटना व लोकप्रतिनिधी संघर्ष करत आहेत. मात्र कांदा उत्पादकांच्या जीवनातील संघर्ष व त्यांच्या वाट्याला येणारे कष्ट धोरणकर्त्यांना दिसून येत नाही का?असा प्रश्न निर्माण होतो. म्हणूनच हा सर्व कष्टमय प्रवास देखाव्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न मोरे यांनी केला आहे.शेतकऱ्यांकडे असलेली अंगभूत कला आणि शेतकरी प्रश्नांवरील त्यांची भूमिका या दोन्ही गोष्टी मोरे यांच्या निमित्ताने समोर येतात. .देखाव्यात याचा आहे समावेशकांदा रोप वाटीकेसाठी शेत तयार करणे, कांदा बियाणे, तणनाशक, बुरशीनाशक फवारणी, रोप निंदणी, कांदा लागवडीपूर्व शेत बांधणी व तयारी, शेणखत, रासायनिक खते, कांदा लागवड, कांदा निंदणी, पाणी भरणे, कांदा काढणे, कांदा कापणी, वाहतूक व साठवणूक यासाठी राबणारा शेतकरी या देखाव्यातून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे..राज्य सरकारने देखील कांदा प्रश्नावर धोरण समिती स्थापन केली आहे. ही समिती या सर्व बारीक-सारीक बाबींचा विचार करून शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी पुढे येणार का? असा सवाल देखावा पाहण्यासाठी येणारे शेतकरी करत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.