उसासाठी उचल प्रतिटनाला विनाकपात ३४०० रुपये देणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा आठ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्टअडीच कोटी लिटर्स इथेनॉल उत्पादन आणि आठ कोटी युनिट्स वीज निर्मिती होणार.Sugarcane Price: कोल्हापूर जिल्ह्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने यंदाच्या गाळप हंगामासाठी ऊस दर जाहीर केला आहे. उसासाठी उचल प्रतिटनाला विनाकपात ३४०० रुपये देणार असल्याची घोषणा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. साखर कारखान्याच्या बाराव्या गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. या हंगामात आठ लाख टन ऊस गाळप करण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले..बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या बाराव्या गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारी (दि.२७) ऊसमोळी टाकून झाला. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ आदी उपस्थित होते..Sugarcane Price: दिवाळीत शेतकऱ्यांना मोठी भेट, हरियाणा सरकारने जाहीर केला देशातील सर्वाधिक ऊस दर.यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले, ऊस उत्पादनात एकरी घट होत चालली आहे. ही चिंतेची बाब आहे. आम्ही कारखान्याची विस्तारवाढ करणार आहोत. पण; ऊस कुठून आणणार? असा प्रश्न आहे. कमी दिवसात जास्त गाळप करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी नमूद केले. .Sugarcane Rate : जो जास्त दर देईल, त्याच कारखान्याला ऊस ; माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांची भूमिका .साखर कारखानदारी प्रतिकूल परिस्थितीतून जात आहे. एफआरपी वाढते. पण साखर दर वाढत नाही. गळीत हंगाम अवघा १०० दिवस चालतो, हे कारखान्यांना परवडणारी गोष्ट नाही. कामगारांच्या बहुतांश मागण्या पूर्ण केल्या आहेत. त्रिपक्षीय करारानुसार दहा टक्के पगारवाढही लागू करणार आहोत, असे मुश्रीफ म्हणाले. .प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले की, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना सभासद शेतकऱ्यांच्या जिद्द आणि संघर्षातून उभारला आहे. या कारखान्याने चांगला दर, रोजगार, नावलौकिक, वेगळेपण आणि नाविन्यता जपलेली आहे..नवीद मुश्रीफ यांनी, या हंगामात आठ लाख टन गाळप, अडीच कोटी लिटर्स इथेनॉल उत्पादन आणि आठ कोटी युनिट्स वीज निर्मितीचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. .एकरी उत्पादन वाढले तरच शेती परवडेल एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून ऊस उत्पादन एकरी सव्वाशे ते दीडशे टन होते, हे आता प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. एआयच्या माध्यमातून एकरी उत्पादन वाढवणे हाच एकमेव पर्याय आहे. एकरी उत्पादन वाढले तरच शेती परवडेल आणि साखर कारखानदारी चालेल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ऊस उत्पादनवाढीचा संकल्प करा आणि शपथ घ्या, असे मुश्रीफ म्हणाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.