Charges Framed Against Walmik Karad And Gang: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपींविरुद्ध न्यायालयाने आज मंगळवारी (दि.२३ डिसेंबर) आरोप निश्चित केले. या प्रकरणी बीडमधील विशेष मकोका न्यायालयात सुनावणी झाली. यावर आता पुढील सुनावणी ८ जानेवारी रोजी होणार आहे..अखेर आज न्यायालयाने वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँगविरोधात आरोप निश्चित केले. ९ डिसेंबर २०२०४ रोजी संतोष देशमुख यांचा खून कट करुन संगनमताने आरोपींनी केला आणि त्याचप्रमाणे यातील काही पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याला कारण म्हणजे वाल्मिक कराड जो खंडणी मागत होता; ती खंडणी अवादा कंपनीकडून मिळण्यास संतोष देशमुख यांनी अडथळा केला. याकरिता त्यांचा खून करण्यात आला. अशारितीचा सरकारतर्फे आरोप प्रस्तावित केला. त्यानुसार न्यायालयाने आज सर्व आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले, अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सुनावणीनंतर दिली. .Santosh Deshmukh Case: खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू, ही सरकारची घोषणा हवेतच विरली- रोहित पवार.या प्रकरणी सुनावणीची पुढील तारीख ८ जानेवारी ठेवली आहे. आजही आरोपींकडून आरोप निश्चितीची सुनावणी लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न झाला. या खटल्यामध्ये आरोपींनी आतापर्यंत वेळोवेळी हातखंडे वापरून उशीर करणे आणि खटला उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला. पण आज आरोप निश्चित झाल्याने या प्रयत्नांना चाप बसला. सरकारतर्फे कागदपत्रे, ज्यांच्यावरती सरकारी वकील भिस्त ठेवत आहे; अशी कागदपत्रे आरोपींना मान्य आहेत की अमान्य आहेत यासाठी विचारले जाईल. त्यानंतर साक्षीदारांची यादी दिली जाईल. प्रत्यक्षात पुराव्याचे काम लवकरच सुरु होईल, असे अॅड. निकम यांनी सांगितले. .Santosh Deshmukh Murder Case : खून घटनेचा प्रवास आठ ऑक्टोबरपासून सुरू ; अॅड. उज्ज्वल निकम यांचा ३२ मिनिटांचा युक्तिवाद.आरोप निश्चित करण्यासाठी वेळ लागला. पण न्यायालयाला वेळ द्यावा लागतो. फास्ट ट्रॅक कोर्ट असो स्लो ट्रॅक कोर्ट असो, खटला लवकरात लवकर चालण्याचा प्रयत्न सरकारकडून होईल. आरोपींकडून तीच तीच कारणे न्यायालयापुढे मांडण्यात येत होती. न्यायालयाने आज प्रत्येक आरोपीला विचारले की, तुमच्याविरुद्ध जे आरोप ठेवण्यात आलेले आहेत ते मान्य आहेत का? त्यावर आरोपींनी आरोप मान्य नसल्याचे सांगितले. न्यायालयाकडून हे रेकॉर्ड तुरुंगात पाठवण्यात येईल. तुरुंगातून त्यावर स्वाक्षरी झाल्यानंतर पुन्हा खटल्याच्या कामाला सुरुवात होईल, असे ते म्हणाले. .उच्च न्यायालयाने आरोपीनिश्चितीसाठी कुठेही स्थगिती दिलेली नाही. त्यांनी काल तसा प्रयत्न उच्च न्यायालयात केला होता. पण उच्च न्यायालयाने त्यांना तोंडी नकार दिल्याचे अॅड. निकम यांनी नमूद केले. आज सर्व आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते..संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण केले होते. त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली होती. देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.