Dehu News: ज्ञानोबा-तुकाराम नामघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजरात गुरुवारी (ता. ५) अवघी देहूनगरी दुमदुमली. संत तुकाराम महाराजांचा ३७८ वा बीज सोहळा परंपरेनुसार इंद्रायणी नदीच्या तीरावर मोठ्या उत्साहात झाला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या सोहळ्यास उपस्थित होते..सकळीकांचें समाधान ।नव्हे देखिल्यावांचून ॥१॥रूप दाखवीं रे आतां ।सहस्रभुजांच्या मंडिता ॥ध्रु.॥शंखचक्रपद्मगदा।गरुडासहित ये गोविंदा ॥२॥तुका म्हणे कान्हा ।भूक लागली नयनां ॥३॥.Sant Tukaram Maharaj Palkhi: अकलूजमध्ये पार पडले गोल रिंगण.या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओव्यांप्रमाणे वैष्णव भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांनी हा सदेह वैकुंठगमन सोहळा अनुभवला. सदेह वैकुंठगमनाची वेळ जशी जवळ येत होती, तशी टाळ-मृदंग आणि तुकाराम तुकाराम नामघोषाने देहूनगरी दुमदुमत होती. इंद्रायणी नदीच्या काठावर जमलेल्या भाविकांनी वैकुंठगमन सोहळ्याची वेळ जवळ येताच दुपारी साडेबारा वाजता नांदुरकीच्या वृक्षावर पुष्पवृष्टी केली..बीज सोहळ्याच्या दिवशी संत तुकाराम महाराजांच्या मुख्य देऊळवाड्यात पहाटे तीन वाजता काकडा आरती झाली. पहाटे चार वाजता संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांनी सपत्नीक विठ्ठल-रखुमाई यांची महापूजा केली. संत तुकाराम महाराज शिळा मंदिरातील महापूजा संस्थानचे विश्वस्त लक्ष्मण महाराज मोरे यांच्या हस्ते झाली. पहाटे साडेपाच वाजता वैकुंठस्थान मंदिरात संत तुकाराम महाराजांची महापूजा विश्वस्त उमेश महाराज मोरे यांच्या हस्ते झाली..Sant Tukaram Maharaj Palkhi: संत तुकाराम महाराज पालखीची जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महापूजा.सकाळी दहा वाजता संत तुकाराम महाराजांच्या पादुका शेजघरातून मुख्य विठ्ठल-रखुमाई मंदिरात आणण्यात आल्या. पाद्यपूजनानंतर पादुका भजनी मंडपात फुलांनी सजविण्यात आलेल्या पालखीत ठेवण्यात आल्या. रूप पाहता लोचनी, राहू आता हेचि ध्यान, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम हे अभंग झाल्यानंतर पालखी वैकुंठस्थान मंदिराकडे मार्गस्थ झाली. पालखीच्या पुढे सनई-चौघडे, ताशे, नगारे, अब्दागिरी आणि टाळकरी होते..पालखीपुढे मानाची कल्याणकरांची दिंडी होती. रस्त्यावर दुतर्फा भाविक दर्शनासाठी उभे होते. वैकुंठस्थान मंदिरासमोर संस्थानचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ कीर्तनकार बापूसाहेब मोरे यांचे संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळ्यावरील कीर्तन झाले. भाविकांनी नांदुरकीच्या वृक्षावर पुष्पवृष्टी केली. वैकुंठस्थान मंदिरात संस्थानचे विश्वस्त गणेश महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी- चिंचवडचे महापौर रवींद्र लांडगे, प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या हस्ते आरती झाली. अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, विश्वस्त विक्रमसिंह महाराज मोरे, नगराध्यक्षा पूजा दिवटे, तहसीलदार जयराज देशमुख व इतर उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.