Vitthal Devotees: देवशयनी आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे सोमवारी (ता. २९) पौर्णिमेच्या मुहूर्तावर त्र्यंबकेश्वरातून पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. ‘धन्य धन्य निवृतीदेवा...’ आणि ‘सर्व सुखे निवृत्तीचे पायी...’ या अभंगांसह ‘ज्ञानोबा-तुकाराम’ च्या जयघोषाने त्र्यंबकनगरी दुमदुमून गेली..दुपारी दीड वाजता निवृत्तिनाथ मंदिरात भाविकांनी भजनाला सुरुवात केल्यानंतर सोहळ्याला रंग चढला. संपूर्ण मंदिर परिसर वारकऱ्यांनी गजबजून गेला. दुपारी समाधीची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर सजविलेल्या पालखीत निवृत्तिनाथांच्या चांदीच्या प्रतिमा आणि पादुका ठेवण्यात आल्या. .Ashadhi Wari 2026: सोलापूर जिल्हा परिषदेकडून आषाढी वारीतील विकासकामांच्या निविदांना मंजुरी.महाआरतीनंतर जयघोषात पालखी चांदीच्या रथात विराजमान करण्यात आली. दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर रथ कुशावर्त तीर्थावर स्नान व पूजेसाठी नेण्यात आला. पुढे पालखी बोहरीपट्टीमार्गे त्र्यंबकेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाली. उत्तर दरवाजासमोर त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले..Wari Departure Ceremony: वारी प्रस्थानासाठी प्रशासन सज्ज; इंद्रायणीपासून अतिक्रमण हटविण्यापर्यंत तयारीला वेग.दिंडीच्या प्रस्थानावेळी जलसंपदा व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, मनसे नेते अमित ठाकरे, खासदार राजाभाऊ वाजे, महापौर हिमगौरी आहेर-आडके, आमदार गोकुळ गिते, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डी. एस. स्वामी यांच्यासह श्री संत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानचे आजी-माजी अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते..त्र्यंबकेश्वर नगरीत सुरू असलेल्या विकासकामांमुळे अडीचशे वर्षांच्या परंपरेत प्रथमच पालखीचा मार्ग बदलण्यात आला. महापूजेनंतर पालखी भगवती चौक, बोहरीपट्टी, त्र्यंबकेश्वर मंदिर मार्गे श्री संत गजानन महाराज संस्थानच्या मुख्य नाक्यापर्यंत आली. येथे नागरिकांनी पालखीला निरोप दिला. त्र्यंबकेश्वरहून प्रस्थान केल्यानंतर पालखीचा पहिला रात्रीचा मुक्काम पेगलवाडी येथील महानिर्वाणी आखाड्यात झाला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.