Palkhi Procession: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे बुधवारी (ता. १५) टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे आगमन झाले. फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ-मृदंगाच्या गजरात तल्लीन झालेले वारकरी यामुळे पालखी सोहळा भक्तिरसात चिंब न्हाऊन निघाला..संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे,.Wari 2026: वारी : महाराष्ट्राच्या लोकमनाची अद्भुत परंपरा.जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, वाईचे प्रांताधिकारी योगेश खरमाटे यांनी पुष्प अर्पण करून स्वागत केले. पोलिस बँड पथकाने विविध वाद्यांच्या धून वाजवून पालखीचे स्वागत केले..Ashadhi Wari 2026: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान.नीरा नदीतील स्नानानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींची पालखी पाडेगाव येथे दाखल झाली. या वेळी मान्यवरांसह लाखो भाविकांनी माउलींचे दर्शन घेतले. माउलींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती..प्रशासनाने वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच जागोजागी स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांबाबत वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.