Sangli Water Crisis: एल निनोच्या संभाव्य परिणामांमुळे जिल्ह्यात पाणीटंचाईसह उद्भवणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून प्रतिबंधात्मक व आपत्कालीन उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, तसेच उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करून जलस्रोतांच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिले..सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात एल निनोचा प्रभाव व त्याबाबत करावयाच्या उपाययोजना याबाबत बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे प्रत्यक्ष, तर पाटबंधारेचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे दृरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. पाटबंधारे विभाग, लघुपाटबंधारे, पाणीपुरवठा, रोजगार हमी विभाग, जलसंधारण, कृषी, पशुसंवर्धन, अन्न व नागरी पुरवठा आदी संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी सहभागीहोते..Water Conservation Management: पाण्याचे दुर्भिक्ष कमी करण्यासाठी जलसंधारणाचे उपाय.डॉ. घोष म्हणाले, ‘‘पाटबंधारे विभागाने उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करावे. त्यांनी महसूल, ग्रामविकास विभाग व पाणीपुरवठा विभागाशी समन्वय ठेवून पिण्याच्या पाण्याची टंचाई उद्भवू नये, यासाठी उपलब्ध जलस्रोतांचे वेळीच नियोजन करावे. जलस्रोतातील पाणी नमुने वेळोवेळी तपासावेत.’’.Water Scarcity Management: पाणीटंचाई व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज.हवामानातील बदल, पर्जन्यमानातील संभाव्य तफावत, उष्णतेची लाट, पाणी टंचाई, शेतीवरील परिणाम, उपलब्ध पाणीसाठा, सिंचनासाठी आवश्यक पाणी, संभाव्य टंचाईत पिण्याच्या पाण्याचे नियोजन, चारा, बियाणे आणि खतसाठा, धान्यसाठा आदींवर चर्चा झाली..बैठकीतील सूचनाजलस्रोतांच्या दुरुस्ती, जलयुक्त शिवारची कामे युद्धपातळीवर करा.नाला खोलीकरण प्राधान्याने करा.पाझर तलावांसह स्रोतांतील पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवा.विहिरी अधिगृहीत करण्यासाठी प्रस्ताव द्या.पाणीसाठे नियोजनाचा आराखडा बनवा.सर्व विभागांचे टंचाई कृती आराखडे तयार ठेवा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.