Sangli News: सांगली जिल्ह्यातील यंदाच्या हंगामातील सोळा साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. या सोळा साखर कारखान्यांनी ७९,९९,१२१ टन उसाचे गाळप करत ८४ लाख ५७ हजार ४५५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखरेचा उतारा १०.५७ टक्के इतका राहिला आहे..जिल्ह्यात यंदाच्या गाळप हंगामात १० सहकारी आणि सहा खाजगी साखर कारखान्यांनी गाळप सुरु केले. दरम्यान, उसाला पहिली उचल ३७५१, तर मागील हंगामातील २०० रुपये असा दर द्या, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली होती. मात्र, साखर कारखान्यांनी याबाबत भूमिका घेतली नाही..Sugarcane Crushing Season: सहा कारखान्यांचा हंगाम आटोपला.त्यामुळे ऊस दराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली, पण यामध्ये तोडगा निघाला नाही. परिणामी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दराबाबत आक्रमक पवित्रा घेतला होता. हंगामाच्या प्रारंभापासून गाळपाला फारशी गती नव्हती. परंतु साखर कारखान्यांनी दर जाहीर करत दराची कोंडी फोडली. त्यानंतरच गाळपाला गती आली..Sugarcane Crushing Season: भीमाशंकर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता.दत्त इंडियाने ८,२३,२१७ टन गाळप करत१०,०२,६८० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. साखर उत्पादनात दत्त इंडिया आघाडीवर आहे. वांगी (ता. कडेगाव) सोनहिरा साखर कारखान्याने ९,७३,०४१ टन उसाचे गाळप केले आहे. गाळपात सोनहिरा अव्वल आहे. .तर साखर उताऱ्यात राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा उतारा १२.५३ टक्के आहे. जत, आटपाडी, खानापूर, या दुष्काळी तालुक्यातील साखर कारखान्यांनी गाळप आणि साखरेचे उत्पादनही चांगले घेतले आहे. नागेवाडीच्या यशवंत शुगरने सर्वात कमी गाळपात आणि साखरेचे उत्पादन घेतले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.