Sangli News: सांगली जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांपैकी नऊ साखर कारखान्यांचा यंदाचा गाळप हंगाम आटोपला आहे. सोळा साखर कारखान्यांनी ७९ लाख २५ हजार १ टनाचे गाळप करत ८३ लाख ४३ हजार ३६५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. जिल्ह्याचा साखरेचा उतारा १०.५३ टक्के आहे. उताऱ्यात राजारामबापू पाटील वाटेगाव आघाडीवर आहे. वांगीचा सोनहिरा साखर कारखाना गाळपात सर्वाधिक पुढे आहे. तर सांगलीचा दत्त इंडिया साखर उत्पादनात आघाडीवर आहे..जिल्ह्यात यंदाच्या गाळप हंगामात १० सहकारी आणि खासगी ६ असे एकूण सोळा साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला. यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीपासूनच काही कारखान्यांपुढे ऊस उपलब्धतेचा प्रश्न होता. मात्र साखर कारखान्यांनी ऊस तोडणीचे काटेकोर नियोजन करत गाळप हंगाम सुरू केले. प्रारंभी कारखान्यांनी पूर्ण क्षमतेने गाळप सुरू केले नव्हते. जिल्ह्यातील प्रत्येक साखर कारखान्यांकडे ऊस तोडणी यंत्रे असल्याने ऊस तोडणी यंत्राद्वारे करण्यात आली..Sugarcane Crushing Season: खानदेशात ऊस गाळप महिनाभर लांबणार.मोहनराव शिंदे आरग, विश्वासराव नाईक चिखली, सद्गुरु श्री श्री राजेवाडी, राजारामबापू पाटील वाटेगाव, राजारामबापू पाटील कारंदवाडी, राजारामबापू पाटील जत, रायगाव डोंगराई, क्रांती कुंडल, यशवंत नागेवाडी या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. येत्या आठ ते दहा दिवसात उर्वरित कारखान्यांची धुऱ्हाडी बंद होतील..Sugarcane Crushing Season: उसाचे वजन कमी होऊन ‘दक्षिणा’ वाढू लागली.गाळप व साखर उत्पादनात यशवंत शुगर (नागेवाडी) सर्वांत कमी असून, साखर उताऱ्यात उदगिरी शुगर (बामणी) सर्वांत कमी आहे..कोल्हापूर विभागातील गाळप व उत्पादन दृष्टिक्षेपातकारखान्यांची संख्या ः ३९गाळप (टन) ः २,०६,५४,२१३साखर उत्पादन (क्विंटल) ः २,२६,४८,७१५उतारा ः १०.९७ टक्के.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.