Sangli News : जिल्ह्यात मे महिन्यापासून ऑगस्टच्या मध्यापर्यंत सततच्या पावसामुळे नदीकाठच्या भागात आडसाली हंगामातील ऊस लागवड काही प्रमाणात खरडली आहे. आडसाली हंगामातील ऊस लागवड अंतिम पट्ट्यात आली आहे. ऊस लागवडीस गती आली आहे. यंदा आडसाली हंगामातील ऊस लागवड २० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता असून पूर्व हंगामातील ऊस लागवडीचे क्षेत्र वाढेल, असा अंदाज साखर कारखानदारांनी व्यक्त केला आहे.\.जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून ऐन हंगामात पडणारा पाऊस आणि पावसाचा खंड असे दुहेरी संकट आडसाली हंगामातील ऊस लागवडीवर ओढावत आहे. परिणाम आडसाली हंगामातील ऊस लागवडीवर होत असल्याचे चित्र आहे. दोन वर्षांपूर्वी पावसाचा काही प्रमाणात खंड आणि त्यानंतर सलग झालेला पाऊस यामुळे या हंगामातील शेतकऱ्यांचे ऊस लागवडीचे वेळापत्रक कोलमडले..Sugarcane Farming : ऊस व्यवस्थापनातील महत्त्वाचे मुद्दे.त्यामुळे २०२४-२५ मध्ये ४७ हजार ०३६ हेक्टरवरील आडसाली उसाचे गाळप झाले होते. तर गतवर्षीही अशीच परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे २०२५-२६ आडसालीचे ४४ हजार ९१४ हेक्टरवरील उसाचे गाळप होणार आहे. अर्थात २१२२ हेक्टरने क्षेत्र कमी झाले आहे..यंदा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली. जूनच्या मध्यापर्यंत मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर पंधरा दिवस पावसाने उघडीप दिली. जुलै, ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने शेतकऱ्यांचे लागवडीचे नियोजन कोलमडले. या साऱ्यामुळे आडसाली हंगामातील ऊस लागवडीस फारशी गतीही आली नाही. .अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली आहे. दरम्यान, जिल्ह्यात ऑगस्टच्या मध्यापर्यंत १८हजार ४१४ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. अतिवृष्टीमुळे यंदाही आडसाली हंगामातील उसाच्या लागवडीत २० टक्क्यांने क्षेत्र कमी होईल, असा अंदाज आहे. .Sugarcane Farming : नंदुरबारमध्ये ऊस पीकवाढ चांगली .शेतकऱ्यांचा कल ऊस रोप लागवडीकडे वाढला आहे. सुमारे ६० ते ७० टक्के रोप लागवड झाली आहे. दरम्यान, काही दिवसांत पूर्व हंगामातील ऊस लागवड सुरू होईल. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी नियोजनही केले आहे. एकंदर पाहता, मे पासून ऑगस्टच्या मध्यापर्यंत झालेल्या पावसामुळे आडसाली हंगामातील उसाच्या क्षेत्रावर पूर्व हंगामातील उसाची लागवड होईल. त्यामुळे पूर्व हंगामातील उसाच्या क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाजही कारखानदारांनी व्यक्त केला आहे.\.जिल्ह्यातील शेतकरी को-८६०३२, १०००१, ०२६५ प्रचलीत उसाचे वाणांची लागवड करत आहेत. यंदाच्या हंगामापासून फुले १५०१२, फुले १३००७, फुले १५००६ या तीन वाणांची लागवड करू लागले आहेत. बदलत्या वातावरणाचा फटका ऊस पिकालाही बसू लागला आहे. बहुतांश ठिकाणी तांबेरा, लोकरी, पांढरी माशी, हुमणीचा प्रादुर्भाव वाढू लागला असून शेतकरी हतबल झाला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.