Sangli News : जिल्ह्यात यावर्षी १ जून ते ३१ ऑक्टोबर या पाच महिन्यांची पावसाची सरासरी ६२०.७ आहे. या पाच महिन्यांत ६८०.६ म्हणजे १०९.७ टक्के इतक्या पावसाची नोंद झाली. शिराळा तालुक्यात १३८५ मिलिमीटर पाऊस झाला असून चरण मंडलात २ हजार ३५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली..जून महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली. जुलैच्या मध्यापर्यंत पावसाचा जोर मंदावला होता. त्यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली. मात्र, हा पाऊस दुष्काळी तालुक्यांत झाला. त्यामुळे जुलैमध्ये ८६.६ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे..Unseasonal Rain Paddy Crop Damage: अवकाळी पावसाने भातशेतीचे नुकसान.जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, खानापूर तालुक्यांसह मिरज आणि तासगाव पूर्व हे भाग दुष्काळी म्हणून ओळखले जात होते. योजनांचे पाणी पोहचेल तसा एकेक भागाचा शिक्का पुसला जात आहे. पूर्वमोसमी पावसाने मे महिन्यातच आपले रौद्ररूप दाखवले. त्यानंतरचे पाच महिनेही जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. खरिपातील पिकांचा याचा फटका बसला..दुष्काळी तालुक्यातील कवठेमहांकाळ, आटपाडी, जत, खानापूर आणि तासगाव तालुक्यांतही शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला. कवठेमहांकाळ, आटपाडीसह शिराळा आणि पलुस या तालुक्यांत दीड ते पावणेदोन पट पाऊस पडला. गेल्या पाच महिन्यांत मिरज, वाळवा, तासगाव, खानापूर, जत तालुक्यांमध्ये सरासरीच्या कमी-अधिक पावसाचे प्रमाण होते. जून ते ऑक्टोबर केवळ कडेगाव तालुक्यात पाऊस कमी झाला. मात्र, मे महिन्यात तालुक्यातील सर्वच मंडलांत सरासरीच्या १७ ते २० पट पाऊस झाला..जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२१ मिलिमीटरहवामान विभागाने १९६१ ते २०१० या कालावधीतील तालुकानिहाय दैनंदिन पर्जन्य विचारात घेऊन जिल्हानिहाय, तालुकानिहाय सरासरी पर्जन्यमान निश्चित केले आहे. त्यामुळे जिल्ह्याची जानेवारी ते डिसेंबर या कालावधीचा (वार्षिक) सरासरी पर्जन्यमान ७२१.८० मिलिमीटर आहे..दुष्काळी तालुक्यांतही सरासरीपेक्षा अधिक पाऊसजिल्ह्यात गतवर्षी म्हणजे १ जून ते ३१ ऑक्टोबर या पाच मिहिन्यांत १०१०.८ मिलिमीटर म्हणजे १६२.८ टक्के पाऊस झाला होता. शिराळा तालुक्यात १८०७.२ मिमी पावसाची नोंद झाली. जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, आटपाडी या दुष्काळी तालुक्यांतही सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असल्याचे कृषी विभागाने तयार केलेल्या अहवालात नमूद केले आहे..Sangli Rain : सांगली जिल्ह्यात ९१ मिमी पाऊस .मंडलांतील दुप्पट पाऊसपलुस : जून, ऑगस्टआटपाडी : जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरकवठेमहांकाळ : ऑगस्ट, सप्टेंबरशिराळा : जूनतासगाव : सप्टेंबरजत : ऑगस्ट.मंडल : पाऊस (मिमीमध्ये)चरण : २३५१कोकरुड : १७५०शिरशी : १२३८सागाव : ११३२जून २०२५ ते ३१ ऑक्टोबर अखेर तालुकानिहाय झालेला पाऊस.तालुका पाऊस(मिलीमीटरमध्ये) टक्केवारीमिरज ५५८.२ १०८.९जत ६०२ ११३.५खानापूर-विटा ५५६.३ ९९.२वाळवा-ईश्वरपूर ७२२.१ ११०.४तासगाव ६१८.१ ११३.९.शिराळा १३८५ १४५.८आटपाडी ६३०.७ १६७.१कवठेमहांकाळ ६३४.२ १४८.९पलूस ६०३.४ १७६.४कडेगाव ५२५.६ ८६एकूण ६८०.६ १०९.७.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.