Sangli News : जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी कृषी विभागाने सुरू केली आहे. यंदाच्या हंगामात कृषी विभागाकडून १ लाख ७२ हजार टन खते, १९ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. रब्बी हंगामात खते आणि बियाणांची कमतरता पडणार नाही, याची दक्षताही घेतली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिली आहे..जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, मका, हरभरा आणि सूर्यफूल या पिकांचे एकूण १ लाख ९० हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी पूर्व तयारी सुरू केली आहे. .Rabi Season MSP: गव्हात १६०, हरभऱ्यात २२५ रुपये वाढ.मात्र, पावसामुळे खरिपातील काढणी रखडली आहे. जत तालुक्यात आगाप ज्वारीची पेरणी केली जाते. अतिवृष्टी झाल्याने रब्बी हंगामाच्या पूर्व मशागतीसाठी अडथळे निर्माण झाले आहेत. वाफसा आल्यानंतरच पेरणीसाठी पूर्व मशागती करण्याचे नियोजन शेतकरी करणार आहेत..रब्बी हंगामासाठी ज्वारीचे ३३४८, गहू, ७७७०, मका ४५७५ आणि हरभरा ४३२३ क्विंटल असे एकूण १९ हजार ९१६ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. तर युरिया ५६७८९, डीएपी २१८४०, एमओपी २२१३४, यासह अन्य खते ८१६५८ टन असे एकूण १ लाख ८२ हजार ४३० टन खतांची मागणी केली आहे. .Kolhapur Rabi Season: कोल्हापुरात वीस हजार हेक्टरवर रब्बी पेरणीचे उद्दिष्ट.रब्बी हंगामात बियाणे, खतांची कमतरता पडणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घेतली आहे. जिल्ह्यातील ७३७ गावांमध्ये ५८७० हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यासाठी ज्वारीची ५०७ क्विंटलची मागणी केली आहे. हरभरा ४६१ क्विंटल तर गव्हाची ९० क्विंटल मागणी केली जाणार आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली..रब्बी हंगामासाठी लागणारे बियाणे, खते यांची मागणी संबंधित विभागाकडे केली आहे. लवकरच खते, बियाणे उपलब्ध होतील. बियाणे खतांची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घेतली आहे.- मनोजकुमार वेताळ, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.