Kharif Season: कापूस लागवड घटेल, असा अंदाज सुरुवातीपासून असतानाच यंदा मका लागवडीत वाढ झाली आहे. अनेकांनी कापूस पीक टाळून मक्यास पसंती दिली आहे. खानदेशात यंदा सुमारे एक लाख ४० हजार हेक्टरवर मका पीक आहे. .मक्याची लागवड खानदेशात उडीद, मूग व तूर आणि ज्वारी पिकाच्या एकूण क्षेत्रापेक्षा अधिक झाली आहे. मका लागवड मागील हंगामातही एक लाख ४० हजार हेक्टरवर पोचली होती. यंदा मका लागवडीत मोठी वाढ झाली. मका बियाणे टंचाईदेखील अधिकच्या बियाणे मागणीमुळे होती. तसेच मका बियाण्याचा काळाबाजारही काही भागात झाला. अनेकांनी काळ्या कसदार जमिनीत मका लागवड केली आहे. मका लागवडीनंतर काही दिवस हलका ते मध्यम पाऊस आला. जोरदार किंवा एकाच दिवसात ४० ते ४५ मिलीमीटर पाऊस न झाल्याने मका पीकवाढ सर्वत्र चांगली नाही. जोरदार पावसाची गरज असतानाच पावसाने दडी मारली..Maize Cultivation: खानदेशात मका क्षेत्र पोहोचले एक लाख २० हजार हेक्टरवर.आंतरमशागतीचे काम पूर्णमका पिकात एक वेळेस बैलांकरवी आंतरमशागत झाली आहे. तसेच खतेही देण्यात आली आहेत. जळगाव जिल्ह्यात मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र ९० हजार हेक्टर एवढे आहे. परंतु यापेक्षा अधिकची मका लागवड झाली आहे. मक्यास रब्बीतही उठाव होता. मका पिकाची अति पावसात हानी कमी होते..Maize Cultivation: खानदेशात खरीप हंगामात मका लागवड वाढली.तसेच १२० ते १४० दिवसांत मका पीक हाती येते. तसेच अनेक वाणही बाजारात खरिपासंबंधी आहेत. यामुळे अनेकांनी मका पिकास पसंती दिली आहे. मागील हंगामात मका पिकाची अति पावसात हानी कमी झाली होती. यंदाही चांगला पाऊस असल्याचे भाकीत अनेकदा विविध संस्थांनी केले. यामुळे मका लागवडीत शेतकऱ्यांनी पसंती दिली..पिकात तणनियंत्रणास गतीमका पिकासाठी तणनाशकांचा वापर यंदा अधिक आहे. कारण मजुरांकरवी तणनियंत्रण करण्यासाठी एकरी दोन ते अडीच हजार रुपये खर्च येतो. या तुलनेत तणनाशकांसंबंधी खर्च कमी येतो. तसेच मजूर मिळत नसल्याने शेतकरी तणनाशकांचा उपयोग करून तणे नष्ट करून घेत आहेत. यंदा मका पिकातील तणनाशकांची विक्रमी विक्रीही होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.