Farmer Crisis: पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसमोर आता खरीप पिके वाचविण्याचे संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात पावसाने ओढ दिल्याने बाजरी, मका आणि कडधान्यांची वाढ खुंटली असून, काही भागांत पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. पावसाची स्थिती अशीच राहिल्यास यंदा मका, बाजरी आणि कडधान्यांच्या उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट होण्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पीक वाचविण्याबरोबरच आर्थिक संकट उभे ठाकले आहे..जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या २७ दिवसांत ६५.६ मिलिमीटर म्हणजे ५८.९ टक्के इतका पाऊस झाला आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात १४१.१ मिलिमीटर म्हणजे १२६.७ टक्के इतका पाऊस झाला होता. गतवर्षी दुष्काळी तालुक्यांतही सरासरीपेक्षा पाऊस झाला होता. यामुळे खरिपाला हा पाऊस उपयुक्त ठरला होता. मात्र, यंदाच्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या २८ दिवसांत पावसाचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. तर जत, खानापूर, आटपाडी या दुष्काळी तालुक्यांत यंदा पावसाने सरासरीही गाठली नाही. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली आहे. परिणामी पिकांची वाढ खुंटली आहे..Rainfall Deficit: सोयाबीन सलाइनवर; कपाशीची वाढ खुंटली.जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. पलूस, वाळवा, शिराळा, मिरज आणि खानापूर तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने सोयाबीनच्या पेरणीवरही परिणाम झाला आहे. काही ठिकाणी पिकाला फुलोरा आला असून, काही ठिकाणी शेंगा धरण्याची, तर काही ठिकाणी शेंगा भरण्याची अवस्था सुरू आहे. मात्र, पावसाची गरज असतानाच पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे..त्यातच काही भागांत सोयाबीनवर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भावही दिसून आला आहे. त्यामुळे पाऊस, पिकाची अवस्था आणि किडीचा प्रादुर्भाव अशा तिहेरी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. आगाप पेरा झालेल्या भागातील सोयाबीनला अपेक्षित पाऊस मिळाला तर उत्पादन समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. मात्र, मागास पेरा झालेल्या भागातील पिकांना पावसाची मोठी गरज असून, पुढील काळात पाऊस कमी पडल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत..मका, बाजरीसह अन्य खरीप पिकांची वाढ खुंटल्याने ती आता करपू लागली आहेत. पिके पावसाच्या प्रतीक्षेत कोमेजू लागल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास हातातोंडाशी आलेले पीकही हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. एकीकडे उत्पादन घटण्याची चिंता, तर दुसरीकडे वाढता आर्थिक खर्च, अशी दुहेरी कोंडी शेतकऱ्यांसमोर उभी ठाकली आहे..Marathwada Rain Break: मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत पिके ताणावर.शिराळा तालुक्यात धूळवाफ पद्धतीने भाताची पेरणी झाली आहे. सध्या भात पीक फुटवा ते वाढीच्या अवस्थेत असून, पिकाची परिस्थिती चांगली आहे. तालुक्यात अधूनमधून मध्यम पाऊस पडत आहे. हा पाऊस भात पिकास उपयुक्त ठरत आहे..जिल्ह्यातील तुलनात्मक पाऊस दृष्टिक्षेपऑगस्ट महिन्यात शुक्रवार (ता. २७) पर्यंत ६५.६ मिलिमीटर पाऊसगतवर्षीच्या तुलनेत यंदा ऑगस्टमध्ये ७५.५ मिलिमीटर पावसाची तूटतासगाव तालुक्यात सरासरी पाऊसऑगस्टमध्ये आटपाडी तालुक्यात सर्वाधिक कमी पाऊसऑगस्ट २०२५ मधील पाऊस : १४१.१ मिलिमीटर.पावसाच्या खंडामुळे तूर, मूग, उडदासह खरीप पिके डोळ्यादेखत वाळून गेली आहेत. खरीप पिकांतून मिळणारे अपेक्षित उत्पन्न हाती पडणार नसल्याने पुढे काय करायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.- महेश शिवणूर, खोजणवाडी, ता. जत.वातावरणातील बदलाने सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यातच पावसाने दडी मारली आहे. परिणामी अपेक्षित फुलोराही आला नाही. त्यामुळे उत्पादन घटेल.- तात्यासो नागावे-पाटील, खटाव, ता. पलूस.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.