Sangli News: टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांचे लाभ क्षेत्र सुमारे अडीच लाख हेक्टरवर पोहोचले आहे. विस्तारित योजना पूर्ण झाल्यानंतर हे क्षेत्र सव्वातीन ते साडेतीन लाख हेक्टरपर्यंत जाणार आहे. एवढ्या मोठ्या लाभक्षेत्राचे पाणी व्यवस्थापन, पाणीपट्टी वसुलीसाठी जिल्ह्यात एकूण ५५८ सोसायट्या प्रस्तावित आहेत; मात्र शेतकऱ्यांचा अपेक्षित पुढाकार अद्याप दिसून येत नाही..कृष्णा आणि वारणा नद्यांवरील उपसा सिंचन योजना, नदीवरील थेट योजना तसेच लघू व मध्यम प्रकल्पांमुळे जिल्ह्यात सुमारे पावणेपाच लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. सिंचन योजनेचे पाणी वितरण अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करणे या पाणी वापर संस्थेचा उद्देश आहे. .Agriculture Irrigation Issue: विहिरींची कामे रखडल्याने शेती सिंचनापासून वंचित.पाणी वापर संस्थांना योजनेकडून धनमापन पद्धतीने मोजून दिले जाणार आहे. यामुळे समन्यायी पाणी वितरण होणार आहे. यामुळे सोसायट्या स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. साधारण ३०० ते ३५० हेक्टर क्षेत्रावर एका संस्थेचे नियंत्रण राहणार आहे..Agriculture Irrigation Issues: पाणी परवान्यांसाठी शेतकऱ्यांची पायपीट.संस्थेच्या स्थापनेसाठी तीन अधिसूचना काढल्या जातात. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून नोंदणी केली जाते आणि लाभक्षेत्र हस्तांतरित केले जाते. या सोसायट्या संबंधित क्षेत्रात कोणते पीक घेतले जाणार, त्यासाठी किती पाणी व कोणत्या कालावधीत लागेल, याचे नियोजन करतील. पाटबंधारे विभागाशी समन्वय साधून पाणीपट्टी वसुलीचे कामही करतील. वसुलीपैकी सुमारे ५० टक्के रक्कम नियोजन व व्यवस्थापनासाठी सोसायटीला दिली जाणार आहे..सोसायट्यांची कामेपाणी वापर सोसायट्यांची स्थापना होऊन त्यांच्याकडे क्षेत्र हस्तांतरण करणे ही तांत्रिक व कायदेशीर प्रक्रिया आहे. ती पारदर्शक पद्धतीने पूर्ण केली जात आहे. पुढील वर्षभरात ५५८ सोसायट्या स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. या सोसायट्या पीक पद्धती ठरवणे, पाण्याची गरज निश्चित करणे, पाणी मागणी सादर करणे, पाणीपट्टी जमा करणे आणि नियोजनबद्ध वितरण करणे आदी जबाबदाऱ्या पार पाडतील..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.