Sangli News : जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी आणि जत या दुष्काळी पट्ट्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे जिरायत, बागायत आणि फळ पिकांना मोठा फटका बसला आहे. ८४ गावांतील ६ हजार ५८४ शेतकऱ्यांचे ३५३४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक नजर अंदाज अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे..जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात वारणा आणि कृष्णा काठच्या तालुक्यात पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. परंतु सप्टेंबरच्या मध्यापर्यंत सर्वदूर पावसाने उघडीप दिली होती. मात्र, मध्यानंतर दुष्काळी भागातील, तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी, जत या तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. जत तालुक्यातील पूर्व भागांत मुसळधार पाऊस झाला. या पावसाने डाळिंब बागेत पाणी साचून राहिल्याचे चित्र होते..Rain Crop Damage : परभणी जिल्ह्यात मुसळधारेमुळे पिकांची दाणादाण.जत तालुक्यात सप्टेंबरचा सर्वसाधारण पाऊस १६८.९ मिलिमीटर इतका आहे. तालुक्यात आजअखेर १७२.३ मिमी म्हणजे १०२ टक्के इतक्या पावसाची नोंद झाली. वास्तविक १७ सप्टेंबरपासून सर्व मंडलांत जोरदार पावसाने हजेरी लावली. .माडग्याळ मंडलात गुरुवारी (ता. १८) १३३ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. खानापूर-विटा तालुक्यातही १७०.१ मिमी, तासगाव तालुक्यात १४२.७ मिमी, आटपाडी तालुक्यात २०६ मिमी तर कवठेमहांकाळ तालुक्यात १५५ मिमी पावसाची नोंद झाली. .तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी आणि जत या चार तालुक्यांत १० मिमीपासून ते ८२ मिमी असा पाऊस झाला आहे. या पावसामुळे जिरायत पिकांचे २५१४ हेक्टर, बागायती पिकांचे ५३६ हेक्टर तर फळ पिकांचे ४८३ हेक्टर असे नुकसान झाले आहे. .Rain Crop Damage : दिग्रस तालुक्यात संततधार पावसामुळे पिकांना फुटले कोंब .प्रामुख्याने डाळिंब पिकाला मोठा फटका बसला आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची प्रशासनाकडून पाहणी करण्याचे काम सुरू आहे. कोणत्या भागात किती प्रमाणात नुकसान झाले आहे, याची माहिती कृषी विभागाकडूनही घेण्यात येत आहे..८० टक्के पाऊससप्टेंबरचा जिल्ह्याचा सर्वसाधारण पाऊस १३८.६ मिमी इतका आहे. मात्र, हा पाऊस कमीअधिक प्रमाणात झाला आहे. जिल्ह्यात ०.१ मिमी ते १८.२ मिमी सरासरी पाऊस झाल्याचे अहवालातील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. २३ दिवसांपैकी १२ दिवस पाऊस झाला. अर्थात १२ दिवसांत ८० टक्के पाऊस झाला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.