Sangli News: राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनाचा सर्वाधिक पीक कर्ज देणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेसह अन्य बँकांनी दिलेल्या कर्जाच्या वसुलीवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे सरकारचे आश्वासन बँकांच्या मुळावरच पडणार असल्याची चर्चा सुरू आहे..माजी मंत्री बच्चू कडू यांनी गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची तीव्रता अधिकच वाढल्याने सरकारने गंभीर दखल घेत संबंधित आंदोलकांना मुंबईत बोलावून कर्जमाफीच्या विषयावर चर्चा केली. या चर्चेनुसार ही समिती सरकारला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सविस्तर अहवाल देणार आहे..Loan Waiver Committee: कर्जमुक्ती समितीला अखेर मुहूर्त.त्यानंतर पुढील तीन महिन्यांत म्हणजेच ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारतर्फे दिले आहे. त्यामुळे माजी मंत्री कडू यांनी सुरू केलेले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. असे असले तरी या सरकारच्या कर्जमाफीच्या आश्वासनामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेसह अन्य बँकांनी दिलेल्या शेतीकर्जाच्या वसुलीवर मोठा परिणाम होणार आहे..Farmer Loan Waiver: हातावर देऊन कोपरावर नका मारू.दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अकराशे कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. अन्य बँकांनी सुमारे ४०० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. ३१ मार्च आणि ३० जूनपर्यंत पीक कर्जाची वसुली होते, मात्र कर्जमाफीचे आश्वासन ३० जूनपूर्वी देण्यात आले आहे. त्यामुळे त्यामुळे शेतकरी ३० जून २०२६ पर्यंत कर्ज भरण्याची शक्यता कमीच आहे. परिणामी बँकांच्या पीक कर्जाच्या वसुलीवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे बँकांची आर्थिक उलाढाल थांबण्याची शक्यता आहे..कर्जमाफी म्हणजे वाऱ्यावरची वरात : संजय कोलेसरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याचे दिलेले आश्वासन म्हणजे वाऱ्यावरची वरात असल्याची टीका शरद जोशी शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी केली. एका बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार सरसकट कर्जमाफी होणार नसल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य वेळी कर्जमाफीचे आश्वासन देत आहेत. त्यामुळे कर्जमाफीची कोणतीही खात्री नाही. मुळात शेतकऱ्यांना कर्जमाफी उपयोगी नसून पिकांना योग्य हमीभाव मिळाला पाहिजे. शेतीमालाची खुल्या बाजारात विक्री होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. योग्य भाव व खुली अर्थव्यवस्थेसाठी भांडले पाहिजे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.