Sangali News: थकीत कर्जदार शेतकऱ्यांची सविस्तर माहिती शासनाच्या शिंदे समितीकडे पाठवण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील बॅंकांकडून माहिती पाठविण्याचे काम सुरू आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या ६२ हजार ५७१ कर्जदारांकडे ७२९ कोटी ५१ लाख रुपये मूळ कर्जे आहेत. व्याजासह एकूण थकबाकी एक हजार ६३ कोटी रुपये असल्याची माहिती जिल्हा बॅंक प्रशासनाने दिली..आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी सकारात्मक घोषणा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांमध्ये या हालचालींमुळे आशादायी वातावरण निर्माण झाले आहे. जून-२०२५ पर्यंतच्या मागील पाच वर्षांतील थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्याचे काम विविध जिल्हा बँकांसह सर्वच बॅंकांमार्फत सुरू आहे. सांगली जिल्हा बँकेतही प्रक्रिया सुरू आहे..Farmer Loan Waiver: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना खुशखबर देणार का?.जिल्हा बँकेचे ६२ हजार ५७१ शेतकरी थकीत आहेत. काही मृत कर्जदारांच्या वारसांनी माहिती घ्यावी, असे आवाहन बँकेकडून करण्यात आले. राज्यातील सर्व थकीत शेतकऱ्यांची अचूक यादी तयार करण्याचा शासनाचा उद्देश आहे. माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील थकीत कर्जदारांचा अचूक आकडा शासनासमोर येणार आहे..Farmer Loan Waiver: भू-विकास बँकेच्या पाच हजार १०६ शेतकऱ्यांचे कर्ज माफ.या संपूर्ण प्रक्रियेचा उद्देश राज्यातील खऱ्या अर्थाने थकीत असलेल्या शेतकऱ्यांची स्पष्ट यादी तयार करणे, हा आहे. शासनाच्या पोर्टलवर माहिती ‘अपलोड’ झाल्यानंतर पुढील निर्णय घेणे सोपे जाणार आहे. कर्जमाफीचा निर्णय घ्यायचा झाल्यास अचूक आकडेवारी महत्त्वाची ठरणार असल्याचे प्रशासनातील सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे बँकांकडून माहिती संकलन आणि पडताळणी या दोन्ही गोष्टींना प्राधान्य दिले जात आहे..राज्य शासनाने जून-२०२५ पर्यंतच्या सर्व थकबाकीदारांची माहिती मागवली आहे. ती संकलित करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्हा बॅंकेच्या ६२ हजार ५७१ कर्जदारांकडे व्याजासह एक हजार कोटींहून अधिक रक्कम येणे बाकी आहे.- शिवाजीराव वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बॅंक, सांगली.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.