Sangli News : जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत खते, बियाणे आणि कीटकनाशांची १५०४ नमुने तपासणी घेतले असून त्यापैकी १११० नमुन्यांची तपासणी केली आहे. गेल्या आठ महिन्यांत ३५ परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच ४६ परवाने निलंबित केले असल्याची माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली..जिल्ह्यात वर्षभरात बियाणे १६५०, खते १०५० तर कीटकनाशके ३०० असे एकूण ३००० नमुने तपासणीचे उद्दिष्ट आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रातील खते, बियाणे आणि कीटकनाशकांची तपासणी करण्याची मोहीम गुणवत्ता नियंत्रण विभागाने राबवली आहे. .गेल्या आठ महिन्यांत बियाणांचे ८१२, खतांचे ४८७ आणि कीटकनाशकांचे २०५ नमुन्यांचे तपासणीचे उद्दिष्ट होते. त्यानुसार बियाणांचे ६२८, खतांचे ४४८ आणि कीटकनाशकांचे २२० नमुन्यांचे तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी बियाणे ६२८, खते ३९२ आणि किटकनाशके १७३ नमुन्यांची तपासणीही केली. सद्यःस्थितीला १० गुणनियंत्रण निरिक्षकांच्या माध्यमातून तपासणीचे काम सुरू आहे..Rabi Season : जळगावात रब्बीतही असणार खतांची मोठी मागणी.जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत बियाणांचे २, खतांचे ३३ आणि किटकनाशकांचे १ असे एकूण ३५ परवाने रद्द करण्यात आले आहेत. तर बियाणांचे १०, खतांचे ३१ आणि कीटकनाशकांचे ५ असे एकूण ४६ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. रब्बी हंगामाची लगबग सुरू झाली आहे. .Rabi Season : परभणी जिल्ह्यात ४ हजार ४४५ क्विंटल रब्बी बियाणे वाटपाचा लक्ष्यांक.जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने खते आणि बियाणांची मागणी केली असून बियाणे, खते विक्रीसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून रब्बीसाठी येणाऱ्या बियाणे, खते आणि किटकनाशकांची तपासणीचे नियोजन केले आहे. ११ भरारी पथकांची स्थापना केली आहे. .या भरारी पथकाच्या माध्यमातून रब्बीच्या पार्श्वभूमीवर खते उत्पादक, बियाणे, किटकनाशके उत्पादक कंपन्या आणि साठवणूक ठिकाणे याची तपासणी केली जाणार आहे..रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खते, बियाणे आणि किटकनाशके खरेदी करताना पक्के बिल घ्यावे. यासंदर्भात काही अडचणी आल्यास संबंधित कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) विभागाशी संपर्क करावा.- सुरेंद्र पाटील, विभागीय गुणनियंत्रण निरीक्षक, कोल्हापूर विभाग.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.