Sangli Market Committee Controversy: सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनाच्या मुद्द्यावरून राजकीय आणि न्यायालयीन लढाई सुरू असतानाच, विद्यमान संचालक मंडळातच उभी फूट पडल्याचे चित्र समोर येत आहे. .जत, कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यांतील संचालकांमध्ये या विषयावर तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. शनिवारी (ता. ८) कवठेमहांकाळ येथे होणाऱ्या सभेवर काही संचालक बहिष्कार घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजार समितीतील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे..Sangli APMC: सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनाला स्थगिती.राज्य शासनाने सांगली बाजार समितीचे विभाजन करून मिरज, जत आणि कवठेमहांकाळ अशा तीन स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. या निर्णयाविरोधात विद्यमान संचालक मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतली होती..Nashik APMC: नाशिक बाजार समितीचे विभाजन रद्द करा : शिवाजी चुंभळे .न्यायालयाने जुलै महिन्याच्या अखेरीस शासनाचा त्रिभाजनाचा आदेश रद्द करत ३० दिवसांत सर्व घटकांची सुनावणी घेऊन फेरनिर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशानंतर पणन विभागाने हरकती व सूचना मागवण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असली तरी, संचालक मंडळात मात्र यावरून एकवाक्यता राहिलेली नाही..जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील बहुतांश संचालकांनी विभाजनाला विरोध कायम ठेवला आहे. दुष्काळी भागातील नव्या बाजार समित्या आर्थिकदृष्ट्या सक्षम राहणार नाहीत, असा त्यांचा दावा आहे, तर मिरज तालुक्यातील काही संचालकांनी विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर विभाजनाचा पर्याय स्वीकारण्याची भूमिका घेतली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.