Farmers OTS Scheme: सांगलीत ४७२० शेतकरी ‘ओटीएस’साठी पात्र
Farmer Loan Relief Scheme: शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत एकवेळ समझोता (ओटीएस) अंतर्गत जिल्ह्यातील ४७२० पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्याने २ लाखांवरील रक्कम संबंधित बँकेत भरल्यानंतर बँकेमार्फत ही माहिती दर शुक्रवारी पोर्टलवर अपलोड केली जाईल व शेतकऱ्यास कळविले जाईल.