Wardha News: समुद्रपूर तालुक्यातील वनक्षेत्र सध्या वाघांच्या वाढत्या संख्येमुळे अक्षरशः हादरले असून, संपूर्ण तालुका दहशतीच्या छायेत आहे. पूर्वी ताडगाव व शिवणफळ जंगल परिसरात एखादा- दुसरा वाघ दिसत होता. मात्र आता येथे तब्बल १२ पट्टेदार वाघांचे वास्तव्य स्पष्ट झाल्याने वनविभागही सतर्क झाला आहे..येथे आलेले वाघ ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून स्थलांतर करून समुद्रपूरच्या जंगलात दाखल होत असल्याची चर्चा आहे. चंद्रपूर, नागपूर व वर्धा या तीन जिल्ह्यांच्या सीमा एकमेकांना लागून असल्याने जंगल क्षेत्र सलग आहे. ही सलगता वाघांच्या मुक्त हालचालींसाठी पोषक ठरत असून ताडोबातील वाढती लोकसंख्या बाहेरच्या जंगलांकडे सरकताना दिसत आहे. ताडोबा परिसरात सध्या सुमारे २०० पेक्षा अधिक वाघांचे अस्तित्व असल्याने जंगलात दाटी निर्माण झाली आहे..Tiger Terror : तीन बळी घेणारी नरभक्षक वाघीण अखेर जेरबंद.परिणामी, सुरक्षित अधिवासाच्या शोधात विशेषतः गरोदर वाघिणी व शावकांसह वाघिणी इतर वनक्षेत्रांकडे स्थलांतर करत असल्याचे वन्यजीव तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. गत एक वर्षापासून गिरड परिसरात एक वाघीण तीन शावकांसह वास्तव्यास असून तिच्यासोबत एक प्रौढ वाघही सक्रिय आहे. तसेच कोरा, पवनगाव व चिखली परिसरात दुसरी वाघीण दोन शावकांसह आढळून आली आहे. या भागातही एक स्वतंत्र वाघ संचार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय चार ते पाच वाघ नदी-नाले, शिवार व जंगलालगतच्या वस्त्यांमध्ये फिरत असल्याचे.वनविभागाच्या नोंदीत आहे. वाघांची वाढ ही वन्यजीव संरक्षणाच्या यशाचे द्योतक मानले जात आहे. तरी दुसरीकडे मानवी सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळेवाघांचे संरक्षण आणि माणसांचे रक्षण या दोन्हींचा समतोल साधणारे निर्णय तातडीने घेण्यात यावेत, अशी जोरदार मागणी समुद्रपूर तालुक्यातून होत आहे..Tiger Terror : वाघाच्या दहशतीने शेतीकामेच रखडली.वनविभागाकडून गस्त, ट्रॅप कॅमेरे बसवणे सुरूवनविभागाने गस्त वाढवणे, ट्रॅप कॅमेरे बसवणे, जनजागृती करणे व संवेदनशील भागात तातडीच्या उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांच्या मते केवळ पाहणी व सूचना पुरेशा नसून ठोस आणि दीर्घकालीन व्यवस्थापन योजना राबवण्याची गरज आहे. वाघ व मानवयांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी अधिवास व्यवस्थापन, शिकार प्रजातींची उपलब्धता आणि गावालगतच्या भागात विशेष दक्षता घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे..शेतकरी शेतमजुरांत भीतीवाघांच्या वाढत्या हालचालींमुळे शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पहाटे व सायंकाळच्या वेळेस शेतात जाणे टाळले जात असून अनेक ठिकाणी शेतीकामांवर परिणाम झाला आहे. गुरेढोरे चरण्यास नेणे, सरपण गोळा करणे, तसेच शेतातील राखण या कामांवरही मर्यादा येत आहेत. काही गावांमध्ये वाघांचे ठसे, डरकाळ्या व प्रत्यक्ष दर्शनाच्या घटना घडल्याने भीती अधिकच वाढली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.