Nashik News: बागलाण तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यातील साळवण येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतींना उदंड प्रतिसाद लाभला. गुरुवारी (ता. १२) रोजी पार पडलेल्या या शर्यती पाहण्यासाठी आणि बैलांच्या शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी परिसरातील शेतकरी आणि शौकिनांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमामुळे साळवण परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते..साळवण येथील बैल व्यापारी जिभाऊ गवळी यांनी मांडलेल्या संकल्पनेला गावातील तरुण आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त साथ दिली. त्यानुसार महादर ते पाठवा रोड दरम्यानच्या भव्य मोकळ्या मैदानात या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते..Bullock Cart Race: शर्यत वाऱ्याशी; लढाई व्यवस्थेशी!.या स्पर्धेत केवळ बागलाणच नव्हे, तर शेजारील कळवण, देवळा आणि सुरगाणा या तालुक्यांतूनही मोठ्या संख्येने शेतकरी बैलगाड्या घेऊन सहभागी झाले होते..Nanded Bullock Cart Race: कोंडिबा कोरडे यांच्या बैलजोडीने पटकावला प्रथम क्रमांक .शर्यतीच्या कार्यक्रमप्रसंगी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर चौधरी, गिरीदास महाले, सामाजिक कार्यकर्ते मयूर भोये आदी मान्यवरांनी भेट देऊन स्पर्धकांचा उत्साह वाढवला. शर्यतीत प्रथम क्रमांकावर आलेल्या व विजेत्या बैलगाड्यांच्या मालकांना गावाच्या वतीने आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात आले..कार्यक्रमासाठी महारदर, भिकारसोंडा, पायरपाडा, तुपविहीरपाडा आणि साल्हेर येथील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. आयोजन यशस्वी करण्यासाठी साळवण येथील काळू सोनवणे, जगदीश गवळी, ओमराजू बागुल, गणेश गवळी, काळू बागुल, परसराम गवळी, साहेबराव सोनवणे, काशिनाथ सोनवणे, मोहन सोनवणे, नंदू सोनवणे, गोविंद सोनवणे आणि जिभाऊ गवळी आदी ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.