Publishing Award: छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धेच्या यंदाच्या वर्षीच्या पुरस्कारांची सोमवारी (ता. १) घोषणा करण्यात आली. या स्पर्धेत समूहाने निर्माण केलेला सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकांचा संच या विभागात ‘सकाळ माध्यम समूहा’च्या दिवाळी अंकांच्या संचाला सर्वोत्कृष्ट संचाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. .स्पर्धेचे संयोजक दिनकर शिलेदार यांनी याबाबत माहिती दिली. ‘सकाळ माध्यम समूहा’ने प्रकाशित केलेल्या २०२५ मधील साप्ताहिक सकाळ, अवतरण, ॲग्रोवन, मनी, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर या दिवाळी अंकांच्या संचाला या स्पर्धेत गौरवण्यात आले आहे. .Nitin Gadkari: व्यवसायात विश्वासार्हता, नैतिकता महत्त्वाची.या दिवाळी अंकांनी विषय, आशय, मांडणी, सजावट अशा सर्वच बाबतीत उत्कृष्ट कामगिरी केल्याचा अभिप्राय परीक्षकांनी नोंदवला..Tifan Krishi Gaurav Award: अवॉर्ड संस्थेचा तिफण कृषी गौरव पुरस्काराने सन्मान.या स्पर्धेचे पारितोषिक वितरण १० जूनला सायंकाळी ५ वाजता टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात आयोजित कार्यक्रमात होणार आहे. .कवी-गीतकार प्रवीण दवणे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असून, गायिका राधा मंगेशकर आणि संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर याप्रसंगी उपस्थित असतील. उत्कृष्ट दिवाळी अंकांच्या विविध विभागांतील एकूण ३९ पुरस्कारांचे वितरण यावेळी केले जाईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.