Sakal Agrowon 22 Years: पत्रकारिता आणि शेती यांतील अनोखा प्रयोग असलेले दैनिक ‘सकाळ ॲग्रोवन’ २१ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करून आज (ता. २०) बाविसाव्या वर्षात दमदार पदार्पण करत आहे. त्या निमित्त पुणे येथे एका खास सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांत आठवडाभर विशेष उपक्रम पार पडणार आहेत. .राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे होणाऱ्या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ प्रा. नीरज हातेकर यांचे ‘महाराष्ट्राचे ग्रामीण अर्थकारण आणि शेतीची पुढची दिशा’ या विषयावर उद्बोधक व्याख्यान होणार आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल..Agrowon 21st Anniversary: ‘ॲग्रोवन’च्या वर्धापन दिनानिमित्त नीरज हातेकर यांचे व्याख्यान.अन्न व कृषी संघटनेने (एफ.ए.ओ.) २०२६ हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष घोषित केले आहे. त्या निमित्ताने ॲग्रोवनच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून राज्याच्या कृषी व्यवस्थेतील २१ कर्तृत्ववान महिलांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार आहे..Agrowon 21st Anniversary: ‘ॲग्रोवन’च्या वर्धापन दिनानिमित्ताने महिला शेतकऱ्यांचा होणार सन्मान.बाणेर रस्त्यावरील महाराष्ट्र शासनाच्या यशदा या प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमास सर्वांना मुक्त प्रवेश असून, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असेल. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असतील..कधी : सोमवार, २० एप्रिल २०२६कुठे : लेझीम सभागृह, यशदा, बाणेर रस्ता, पुणेकेव्हा : सकाळी दहा ते दुपारी एक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.