Sachin Ahir Vidhan Parishad Deputy Chairman: उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे सेनेत सामील झालेले आमदार सचिन अहिर यांची बुधवारी (दि. १ जुलै) विधानपरिषदेच्या उपसभापती एकमताने निवड झाली. त्यांच्या निवडीवेळी सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सचिन अहिर यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. .सचिन अहिर यांच्या उपसभापती निवडीसाठी भाजपकडून प्रवीण दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मनिषा कायंदे यांनी प्रस्ताव दाखल केला. ठाकरेंच्या शिवसेनेकडून जगन्नाथ अभ्यंकर यांच्या उमेदवारी अर्जाचा प्रस्ताव अंबादास दानवे यांनी दाखल केला होता. .Sachin Ahir: सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडली; शिंदेंच्या सेनेकडून उपसभापतीपदासाठी भरला अर्ज .पण उपसभापतीपदाची निवड एकमताने करण्याची सभागृहाची पंरपरा आहे, अशी विनंती संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानंतर जगन्नाथ अभ्यंकर यांचा प्रस्ताव अभिजीत वंजारी यांनी मागे घेतला. त्यानंतर सचिन अहिर यांची उपसभापती म्हणून एकमताने निवड झाल्याचे सभापती राम शिंदे यांनी जाहीर केले..Satara ZP Politics: लोकांच्या मनातील अध्यक्ष शिवसेनेचाच : एकनाथ शिंदे.सचिन अहिर अष्टपैलू नेतृत्व- मुख्यमंत्री फडणवीससचिन अहिर यांची चळवळीतून तयार झालेला कार्यकर्ता अशी कारकिर्द राहिली आहे. मुंबईचे प्रश्न, गिरणी कामगारांचे प्रश्न आणि महाराष्ट्रातील एकूण कामगार चळवळीचे प्रश्न हे त्यांनी सातत्याने मांडले. यामुळे खऱ्या अर्थाने त्यांच्या नेतृत्त्वातील प्रगल्भता दिसून आली. सामाजिक क्षेत्रात ते मोठ्या प्रमाणात कार्य करतात. लोकांना मदत करतात. ते एक अष्टपैलू नेतृत्व आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले..गोलंदाज कोणीही असो, चेंडू कितीही वेगाने येऊ दे, त्यांना नेमका चेंडू दिसतो आणि फटका परफेक्ट असतो. असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांचे अभिनंदन केले. .सचिन अहिर हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. ते वरळीतून तीन वेळा विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते. त्यांची २०२२ मध्ये विधानपरिषदेवर सदस्य म्हणून निवड झाली होती. त्यांनी नुकतीच ३० जून २०२६ रोजी शिंदेंच्या शिवसेनेतून विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.