Seed Quality: राज्यातील सोयाबीन बियाण्यांच्या उगवण क्षमतेचा प्रश्न यंदा मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आला असून, बियाणे न उगवल्याच्या वाढत्या तक्रारींमुळे कृषी यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे. दर्जेदार बियाण्यांच्या उपलब्धतेपासून ते बियाणे विक्री व्यवस्थेतील पारदर्शकतेपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. .याच पार्श्वभूमीवर बियाणे विक्रीसाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर झाला असता, तर हे कच्चे दुवे हेरता आले असते, असा सूर व्यक्त होऊ लागला आहे. या पोर्टलच्या वापरास गेल्या काळात झालेला विरोध हा ठरवून केलेला प्रकार तर नव्हता ना, असा संशय जाणकार व्यक्त करीत आहेत. ‘साथी’ पोर्टलच्या माध्यमातून ट्रुथफूल बियाण्यांची विक्री झाली असती, तर त्याची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध झाली असती..Soybean Seeds Complaints: सोयाबीन बियाण्यांविरोधात तक्रारींचा पाऊस.फार्म-१ मध्ये बीजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याची माहिती, बियाण्याचा स्रोत आणि उत्पादन प्रक्रियेची माहिती मिळाली असती. तर फार्म-२ मध्ये उगवण क्षमता, दर्जा, तपासणी अहवाल यांसह महत्त्वाचे तपशील उपलब्ध झाले असते. मात्र, या व्यवस्थेला काही घटकांकडून विरोध करण्यात आला. परिणामी, ट्रुथफूल नावाखाली बाजारात विक्री झालेल्या बियाण्यांची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. या बियाण्यांचा नेमका स्रोत, उत्पादन प्रक्रिया आणि गुणवत्ता तपासणीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत..परराज्यातील कंपन्यांनी राज्यात बियाण्यांचा पुरवठा करताना स्थानिक शासकीय प्रयोगशाळेतील तपासणी अहवाल सादर केला होता का, याचीही आता चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक, असे अहवाल संबंधित यंत्रणांकडे सादर करणे आवश्यक होते. व्यवस्थेतील त्रुटी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे..Soybean Germination Failure: शुद्ध बीजापोटी....राज्यातील तसेच परराज्यातील कंपन्या हंगामात किती बियाणे बाजारात आणणार आहेत, त्यांचा विक्री आराखडा काय आहे, याची माहिती शासनाकडे असणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात ही यंत्रणा प्रभावीपणे राबवली जात नसल्याचे चित्र आहे. कंपन्यांच्या बियाण्यांच्या तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांपैकी सुमारे ३० टक्के नमुने अपेक्षित ५२.५० टक्के उगवण क्षमताही गाठू शकले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामागे अनेक कारणे असू शकतात. मात्र, निकृष्ट बियाण्यांनी बाजारपेठेत प्रवेश केल्यानंतर त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला आहे..बियाणे न उगवल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. सोयाबीनची पेरणी उशिरा झाल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता कृषी शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. उशिराच्या पेरणीसाठी अधिक बियाणे वापरावे लागते आणि उत्पादनावरही परिणाम होतो. त्यामुळे ‘साथी’सारख्या व्यवस्थेला विरोध का झाला, हा प्रश्न शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित करीत आहेत..कायद्याच्या कसोटीवर गुन्हे कितपत टिकतील?सध्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आणि लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे शासकीय यंत्रणा कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करीत आहेत. मात्र, हे गुन्हे न्यायालयात कितपत टिकतील, याबाबत यंत्रणेतूनच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चार-पाच वर्षांपूर्वी शेजारच्या जिल्ह्यात एका कंपनीविरुद्ध सोयाबीन बियाण्याप्रकरणी शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या..सामाजिक कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर कृषी यंत्रणेने संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान कंपनीच्या बाजूने निकाल लागला. त्यानंतर कंपनीने आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल करणाऱ्या तालुका कृषी अधिकाऱ्याला वैयक्तिक बदनामीची नोटीस बजावत न्यायालयात खेचले. सध्या संबंधित अधिकाऱ्याला त्या प्रकरणात न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.