Farmers Loss: शिरोळ तालुक्यात चाऱ्यासाठी लागवड केलेल्या शाळू पिकावर सध्या तांबेरा रोगाने थैमान घातला आहे. तांबेऱ्यामुळे शाळू पीक लाल-पिवळे पडले असून ग्राहक नसल्याने पाच ते सात फुटांवर वाढलेल्या शाळू पिकाचे मोठे नुकसान होत आहे. .गुंठ्याला तीनशे-चारशे रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ऊस निघाल्यानंतर शेतकऱ्यांनी चाऱ्यासाठी शाळू पिकाची लागवड केली. ऊस हंगाम सुरू असताना चाऱ्याची टंचाई असते. दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता ऊस हंगाम संपल्यानंतर तालुक्यात चाऱ्याची टंचाई निर्माण होते..Jowar Farming: बागायती रब्बी ज्वारीचे उल्लेखनीय उत्पादन.शिवाय उपलब्ध हिरव्या चाऱ्याचे दर देखील गगनाला भिडतात. परिणामी पशुपालकांना चाऱ्यासाठी वणवण करावी लागते. जादा दराने चारा खरेदी केल्यानंतर पशुपालन नुकसानीचे ठरते. परिणामी पशुपालक शेतातील बांधावरून गवत, सुका चारा खाद्य उपलब्ध करून जनावरांचे पालन पोषण करत असतात..Jowar Farming: चांगल्या पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारी बहरली.उन्हाळ्यात जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करून उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी चाऱ्यासाठी शाळेची लागवड केली. तबेऱ्यामुळे हाता तोंडाला आलेले पीक नुकसानकारक ठरले आहे. तांबेरा नसता तर गुंठ्याला हजार ते बाराशे रुपयांचा दर मिळाला असता. मात्र शाळू लाल-पिवळा पडल्याने मागणी कमी झाली आहे..सातशे ते आठशे रुपये दराने हा शाळू चाऱ्यासाठी विकावा लागत आहे. जवळपास तीन महिन्यांचे हे पीक सध्या पाच ते सात फुटांवर आले आहे. शेतकऱ्यांकडून पीक चांगले आले तर धान्यासाठी ठेवण्याचा विचार होता. मात्र गेल्या महिन्याभरापासून सुरू असणाऱ्या वातावरणातील सततच्या बदलामुळे शाळू पिकावर तांबेऱ्याचा प्रादुर्भाव जाणवत आहे..हिरवा चारा वाळवण्याची वेळशाळू पिकावर तांबेऱ्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जनावरांसाठी हा चारा अपायकारक ठरू नये यासाठी शाळू काढून तो उन्हात सुकवला जात आहे. तांबेऱ्याचा प्रादुर्भाव कमी करून हा चारा जनावरांना खाद्य म्हणून पुरविण्यात येत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.