Pune News: अमेरिका आणि भारतामधील संबंध ताणलेले असतानाच रशियाने भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे संकेत दिले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी प्रशासनास भारतातून शेतीमाल आणि औषधे खरेदी वाढविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अमेरिकेने लादलेल्या आयात शुल्कामुळे अडचणीत आलेल्या शेतीमालाच्या निर्यातीला काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल..अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आडमुठी भूमिका घेत भारतावर आयात शुल्कवाढीचा बॉम्बगोळा टाकला. भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी बंद करावी, अमेरिकेच्या जीएम मका आणि सोयाबीनसह इतर शेतीमालासाठी बाजारपेठ खुली करावी या प्रमुख मागण्या गळी उतरविण्यासाठी अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या शेतीमाल आणि इतर वस्तूंवर ५० टक्के आयात शुल्क लावले आहे..India Agricultural Exports : आयात शुल्कावरुन अमेरिकेला शह? शेतकरी हितासाठी सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, निर्यातीसाठी आखली ‘ही’ रणनिती.त्यातही भारत रशियाकडून तेल खेरदी बंद करत नाही म्हणून अमेरिकेने २५ टक्के दंडात्मक आयात शुल्क लावलेले आहे. त्यामुळे भारतातून अमेरिकेला होणारी कापड, कोळंबी, सोयापेंड, फळे, भाजीपाल्यांची निर्यात ठप्प झाली आहे. याचा फटका निर्यातदारांसह उत्पादकांनाही बसत आहे..गेल्या काही दिवसांपासून अमेरिका भारतावर दबाव आणखीनच वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी रशिया भारतातून शेतीमाल आणि औषधांची खरेदी वाढविणार असल्याचे सांगितले. “भारताकडून अधिक शेतीमाल खरेदी केला जाऊ शकतो. औषधांसाठी आमच्याकडून काही ठोस पावले उचलली जाऊ शकतात. भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवली, तर आपल्याला सुमारे ९०० अब्ज ते १०० कोटी डॉलर्सचे नुकसान सोसावे लागेल,” असे पुतीन यांनी वालदाई डिस्कशन क्लबच्या वार्षिक आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना सांगितले..De-oiled Rice Bran Exports: केंद्र सरकारने अडीच वर्षांनंतर 'डी-ऑइल्ड राईस ब्रॅन'वरील निर्यात बंदी उठवली.आर्थिक वर्ष २०२५ मध्ये भारत आणि रशिया यांच्यामधील द्विपक्षीय व्यापार ६ हजार ८७० कोटी डॉलर्सचा झाला. त्यात भारताचा वाटा ४८८ कोटी डॉलर्स आणि रशियाचा वाटा ६ हजार ३८४ कोटी डॉलर्स इतका होता. म्हणजेच भारताची आयात निर्यातीपेक्षा कितीतरी जास्त आहे. भारत मोठ्या प्रमाणात रशियातून कच्चे तेल खरेदी करत आहे. ही बाब लक्षात घेता भारतासोबतच्या द्विपक्षीय व्यापारातील असमतोलता कमी करण्यासाठी उपाययोजना आखण्याचे आदेश पुतीन यांनी त्यांच्या प्रशासनाला दिले आहेत..दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांबाबत पुतीन म्हणाले, की रशिया आणि भारत यांच्यात कधीही कोणतीही समस्या अथवा तणाव निर्माण झाला नाही. दोन्ही देशांनी नेहमीच संवेदनशीलपूर्वक विचार करूनच पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले चांगले मित्र आहेत. ‘समतोल साधणारा’, ‘बुद्धिमान’ आणि ‘राष्ट्रहित पाहणारा नेता’ अशा शब्दांत पुतीन यांनी मोदी यांचे कौतुक केले आहे..पुतीन म्हणाले, “रशियाकडून तेल खरेदी थांबविण्याबाबत अमेरिकेने निर्माण केलेल्या दबावापुढे भारत झुकला नाही. ही गोष्ट सर्व भारतीयांना माहिती आहे. अमेरिकेने लागू केलेल्या आयात शुल्कामुळे भारताचे होणारे नुकसान रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीतून भरून निघेल. यातून भारताची एक सार्वभौम राष्ट्र म्हणून प्रतिष्ठा वाढेल.”.भारतातून होणारी निर्यातभारतातून रशियाला मासे, कोळंबी, तांदूळ, तंबाखू, चहा, कॉफी, द्राक्षे आदी कृषी उत्पादनांची निर्यात होते. याशिवाय रासायनिक उत्पादने, औषधे, लोखंड आणि पोलाद, सिरॅमिक उत्पादने, विमानाचे सुटे भाग, यंत्रसामग्री, काच आणि काचेची भांडी, कपडे, चामड्याच्या वस्तू, रबरच्या वस्तू, विद्युत यंत्रसामग्री आणि शस्त्रक्रिया उपकरणे ही उत्पादने निर्यात होतात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.