Ahilyanagar News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत उपोषण करत असलेल्या मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत गेलेल्या मराठा समाजाच्या लोकांचे जेवणाचे हाल झाल्याची बातमी आल्यानंतर आता अहिल्यानगर जिल्ह्यातील गावगावांत खाद्यपदार्थ जमा करून मुंबईला पाठवले जात आहेत. रविवारी (ता. ३१) व सोमवारी (ता. १) जिल्ह्यातील विविध भागांतून वाहने मुंबईकडे गेली आहेत. .मराठा समाजाला ओबीसीतून (कुणबी) आरक्षण मिळावे यासाठी अनेक वर्षांपासून लढा देणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील शुक्रवारपासून (ता. २९) मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून अनेक मराठा समाजाचे कार्यकर्ते, लोक मुंबईत गेले आहेत. .Maratha Reservation: मुंबईतील रस्ते रिकामे करा, परिस्थिती सामान्य करा.गेलेल्यांनी अनेक दिवस पुरेल एवढे खाद्य पदार्थ नेले आहेत. मात्र गाड्या दूर असल्याने व मुंबईत खाद्य पदार्थांची दुकाने बंद असल्याने उपासमार झाल्याची माहिती गाव पातळीवर गेल्यावर आता ग्रामीण भागांतून लोक खाद्य पदार्थ तयार करून मुंबईला पाठवत आहेत. गावातील कार्यकर्त्यांनी भाकरी, चपाती, तिखट पुऱ्या, थपाटे, चटणी, लोणचे पाण्याच्या बाटल्या यासह कोरडे व टिकाऊ अन्न पदार्थ, फूड पँकेट जमा करून मुंबईकडे वाहनांच्या माध्यमातून पाठवले जात आहेत..Maratha Reservation : पोलिसांनी जरांगेंना दिली नोटीस; जरांगे म्हणाले, 'मेलो तरी मागे हटणार नाही'.शेवगाव तालुक्यातील फलकेवाडी, अमरापूर, भगुर, अमरापूर, शहरटाकळी, दहिगावने, भाविनिमगाव परिसरातील, दहिगांवने, रांजणी, भावीनिमगाव, मठाचीवाडी, शहरटाकळी, देवटाकळी, रांजनी, मठाचीवाडीसह परिसरातील मराठा बांधवांनी साहित्य पाठवले आहे. भावीनिमगाव येथून ४००० हजार भाकरी, चटणी संकलित केली. .पाण्याच्या बॉटल, बिस्कीट पुडे, केळी पाठवली. पाथर्डी तालुक्यातील करंजी, मोहोज, मढी, तिसगाव, सातवड, वैजू बाभूळगाव, दगडवाडी, नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती तेलकुडगावसह, जामखेड, कोपरगाव, शिर्डी, राहाता, पाथर्डी, पारनेर तालुक्यातील विविध भागांतून खाद्य पाठवले जात आहे..एक घर एक शिदोरीअहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागांत ‘एक घर एक शिदोरी’ हा उपक्रम राबवत आपल्या समाजबांधवासाठी ‘एक घास माणुसकीचा, एक घास मदतीचा’ हा नारा देत घराघरातून भाकरी व चपात्या, चटणी, लोणचे, पाण्याच्या बाटल्या, बिस्किटे व इतर खाद्य पदार्थ पाठवत आहेत. मुंबईतील अंदोलन सुरू राहील तोपर्यंत साहित्य पाठवले जाईल, असे सांगितले जात आहे. मराठी पत्रकार परिषदेचे नेते मन्सुरभाई शेख यांनी पाण्याच्या बाटल्या पाठवल्या आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.