Rural Economy : आरेगाव, जि. यवतमाळ दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीतील रोजगार घटल्याने पुसद तालुक्यातील हजारो मजुरांनी रोजगारासाठी गाव सोडले आहे. ऑक्टोबरच्या प्रारंभीच साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाल्याने ऊसतोड मजूर कारखाना क्षेत्रात दाखल झाले असून, तालुक्यातील तांडे आणि वाड्या ओस पडू लागल्या आहेत..पुसद तालुक्यात मोठे उद्योग, बारमाही सिंचन सुविधा आणि शेतीमाल प्रक्रिया उद्योगांचा अभाव आहे. त्यामुळे खरीप हंगामातील शेतीकामे संपल्यानंतर मजूरवर्गाला ऊसतोडणी, विटभट्ट्या आणि महानगरांतील बांधकामांवर रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते. यंदा पावसातील दीर्घ खंडामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शेतीतील कामांच्या संधी आणखी कमी झाल्या आहेत. पुसद तालुक्यातील सुमारे सातशे एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या औद्योगिक वसाहतीत मोजकेच उद्योग सुरू आहेत. परिणामी, स्थानिक पातळीवर बारमाही रोजगार उपलब्ध होत नसल्याने मजुरांना कुटुंबासह गावाबाहेर पडावे लागत आहे. या स्थलांतराचा परिणाम त्यांच्या मुलांच्या शिक्षणावरही होत आहे..Revenue Department: उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांच्या सन्मानामुळे इतरांना प्रेरणा : कुंभेजकर.कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुसद तालुक्यात रब्बी हंगामात सुमारे १७ हजार २३८ हेक्टर क्षेत्रावर गहू, हरभरा, ऊस आणि भाजीपाला पिकांची लागवड होते. मात्र, यंदा पावसातील खंडामुळे भूजलपातळी खालावली असून अनेक तलाव, नाले आणि नदीपात्रांतील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे रब्बी पेरणीच्या क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनाही पिकांची काढणी होईपर्यंत पाणीसाठा पुरेल की नाही, याची चिंता आहे. ऊस लागवडीतही घट होण्याची शक्यता असल्याने आगामी गाळप हंगामासमोर आव्हान निर्माण होऊ शकते..Delhi Protest: राजधानी दिल्लीला तुरुंग का बनवले?.रोजगारनिर्मितीची गरजराज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या पुसद तालुक्यात रोजगाराच्या मर्यादित संधी ही गंभीर समस्या आहे. शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग, बारमाही सिंचन प्रकल्प आणि सहकार क्षेत्राला चालना दिल्यास स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होऊ शकते..विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्नमजुरांच्या स्थलांतरामुळे गावांतील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटू लागली आहे. रोजगारासाठी पालकांसोबत स्थलांतर करणाऱ्या मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हंगामी वसतिगृहांची व्यवस्था करण्याची गरज आहे. यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.