Farmer Health Service Issue: भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे शेती. शेतकरी हा खरा अन्नदाता आहे. आपल्या श्रमाने आणि परिश्रमाने तो संपूर्ण देशाचे पोट भरतो. ज्या शेतकऱ्याच्या खांद्यावर संपूर्ण समाजाची उपजीविका अवलंबून आहे, त्याच्या स्वतःच्या आरोग्याकडे त्याचे स्वतःचे लक्ष अपुरे असते. शिवाय ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या सुविधा मर्यादित असल्यामुळे शेतकऱ्यांचे आरोग्य हा आज गंभीर चर्चेचा विषय बनला आहे..शेतकरी दिवसभर उन्हातान्हात कष्ट करणारा असतो. पेरणी, नांगरणी, फवारणी, कापणी, जनावरांची देखभाल, सिंचन आदी कामांमध्ये तो व्यस्त असतो. त्यामुळे त्याला पुरेशी विश्रांती मिळत नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत काम केल्याने शरीरावर ताण येतो. पाठदुखी, गुडघेदुखी, संधिवात यांसारख्या समस्या निर्माण होतात. शेतीत कीडनाशके व रासायनिक खते मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. योग्य साधने वा सुरक्षितता न वापरल्यास त्याचा थेट परिणाम श्वसनसंस्था, त्वचा व डोळ्यांवर होतो..Farmer Mental Health : शेतकऱ्यांचे मानसिक आरोग्य कसं जपणार ?.शेतात काम करताना वेळेवर पाणी न मिळाल्याने निर्जलीकरण होते, तसेच असंतुलित आहारामुळे रक्तक्षय, कुपोषण, मधुमेह किंवा उच्चरक्तदाब यांसारखे आजार वाढतात. नैसर्गिक आपत्ती, पिकांचे नुकसान, कर्जबाजारीपणा या गोष्टींमुळे शेतकरी सतत तणावाखाली जगतो. त्यातून उद्भविणारे नैराश्य व मानसिक आजारही आरोग्याला धोका निर्माण करतात..माझ्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये आकस्मित मृत्यूच्या घटना उपविभागीय दंडाधिकारी म्हणून मृत्यूचे कारण प्रसिद्ध करण्यासाठी येत असत. साप चावून मृत्यू, बैलाने मारल्यामुळे मृत्यू, शेळ्या राखायला गेल्यावर अचानक नदीला पूर आल्यामुळे बुडून मृत्यू, वीज पडून मृत्यू, विजेचा शॉक लागून मृत्यू, ट्रॅक्टरवरून पडून मृत्यू, अशा प्रकारच्या हजारो घटना निदर्शनास आल्या. या प्रकरणांची छाननी केली असता योग्य ती दक्षता न घेतल्यामुळे किंवा निष्काळजीपणामुळे अनेक घटना घडत असल्याचे निदर्शनास आले..Rural Development: गावाने पुढाकार घेऊन केले पाणंद रस्ते.आरोग्याकडे दुर्लक्ष नकोगावागावात प्राथमिक आरोग्य केंद्रे असली तरी त्यांची सुविधा अपुरी आहे. डॉक्टरांची कमतरता, औषधांचा तुटवडा, तंत्रज्ञानाचा अभाव यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी उपचार मिळत नाहीत. एखाद्या गंभीर आजारासाठी त्यांना शहरांकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा बोजा त्यांच्या खांद्यावर येतो. शेतकरी आजारी पडला तर शेतीचे काम थांबते. कुटुंबाचा उदरनिर्वाह बिघडतो. पिकांचे उत्पादन घटते, त्याचा थेट परिणाम बाजारपेठेवर आणि शेवटी सामान्य ग्राहकांवर होतो. म्हणून शेतकऱ्याचे आरोग्य हे केवळ त्याच्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण समाजाच्या अन्नसुरक्षेशी निगडित आहे. .आगामी काळामध्ये आरोग्याचा वाढता प्रश्न व खर्च विचारात घेता शेती करण्याबरोबरच नेमकेपणाने स्वतःच्या आरोग्याकडे अधिक लक्ष शेतकऱ्यांना पुरवावे लागेल. शेतकऱ्यांनी नियमित पौष्टिक आहार घ्यावा. दूध, डाळी, भाजीपाला, फळे यांचा आहारात समावेश करावा. कीडनाशके फवारणी करताना हातमोजे, मास्क, चष्मा वापरणे आवश्यक आहे. दर सहा महिन्यांनी आरोग्य तपासणी करून आजार लवकर ओळखणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम, योग, ध्यान यांचा अवलंब केल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते. विमा योजना, जनजागृती कार्यक्रम, औषधांची उपलब्धता यावर भर द्यावा..समाजातील इतर घटकांनीही शेतकऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. येत्या काळामध्ये स्पेशालिटी हॉस्पिटल ग्रामीण भागामध्ये सुद्धा उघडले जातील. मात्र आरोग्याचा खर्च देखील वाढणार आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. हॉस्पिटलमधल्या चार दिवसांचा खर्च हा त्याच्या तीन वर्षांच्या उत्पन्नापेक्षा जास्त येतो. ही बाब विचारात घेता रोजगार बुडेल म्हणून किंवा शेतीची कामे खोळंबली म्हणून आरोग्याकडे दुर्लक्ष करणे नुकसान करणारे आहे. या बाबतीत शेतकरी अधिक दक्षता भविष्यकाळात बाळगेल..आरोग्य सक्षम तर शेती सक्षमहवामान बदलामुळे वाढणारे तापमान, पाण्याची टंचाई, अनियमित पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे श्रम अधिक वाढले आहेत. यामुळे उष्माघात, त्वचारोग, डोळ्यांचे विकार हे प्रमाण वाढत आहे. शिवाय, यांत्रिकीकरणामुळे शेतात काम करणाऱ्यांचे अपघातही घडत आहेत. कमी उत्पन्न, कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी उपचारासाठी खर्च करू शकत नाही. अशा वेळी आरोग्य विमा हा मोठा आधार ठरतो. शासनाच्या ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’, ‘महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना’ अशा योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे अत्यावश्यक आहे. शेतकरी हा समाजाचा पोशिंदा आहे. त्याच्या घामाच्या थेंबातून देशाची भूक भागते. त्यामुळे त्याचे आरोग्य जपणे ही समाजाची आणि शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. शेतकऱ्यांचे आरोग्य सक्षम असेल तरच शेती सक्षम होईल. म्हणूनच ‘शेतकऱ्यांचे आरोग्य’ हा विषय केवळ शेतकऱ्यांपुरता मर्यादित नसून संपूर्ण मानव समाजाच्या भविष्याशी निगडित आहे.shekharsatbara@gmail.com.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.