Nagpur News: शहराच्या वेशीवर यापूर्वी आढळलेल्या दोन बिबट्यांना वनविभागाने यशस्वीपणे जेरबंद केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा उत्तर नागपूर राजीवनगर परिसरात बिबट्या दिसल्याचा दावा करणारे छायाचित्र व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे आहे..व्हिडीओ व्हायरल होताच वन विभागाने तातडीने दखल घेतली. पार्डी, उत्तर नागपूर तसेच राजीवनगर परिसरात वन विभागाच्या पथकाने शोधमोहीम राबवली. संशयित ठिकाणी तपासणी करण्यात आली, पाऊलखुणा, ओरखडे किंवा बिबट्याच्या उपस्थितीचे कोणतेही ठोस पुरावे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला..Leopard Terror: बिबटे पकडले, पण दहशत कायम!.मात्र, सखोल शोधानंतरही वन विभागाच्या पथकाला बिबट्याच्या अस्तित्वाचा कोणताही ठोस पुरावा आढळला नाही. यामुळे हा व्हिडीओ एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) जनरेटरद्वारे तयार करण्यात आला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे..उपवनसंरक्षक डॉ. विनिता व्यास यांनी सांगितले की, शहरात बिबट्या आल्याच्या अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. हा विषय अत्यंत संवेदनशील असून अशा प्रकारचे एआय जनरेटेड व्हिडीओ किंवा खोटे फोटो तयार करणे टाळावे. अशा अफवांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण होते आणि त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होतो. .Leopard Terror: पर्यटन हंगामात बिबट्याचा गोंधळ.लोकांमध्ये अनावश्यक घबराट पसरते. शाळा, कार्यालये आणि दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम होतो. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर येणाऱ्या अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरवू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले..दरम्यान, शहरातील ज्या भागांमध्ये पूर्वी बिबट्याचे वास्तव्य आढळले होते, त्या परिसरात खबरदारीचा उपाय म्हणून वन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ते नियमित गस्त घालत असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. संशयास्पद बाब आढळल्यास वन विभागाशी संपर्क साधावा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.