Fishing Halted: समुद्रात वादळी स्थिती निर्माण झाल्याने विविध भागांतून मासेमारीसाठी आलेल्या शेकडो नौका देवगड किनाऱ्यावर आश्रयाला थांबल्या आहेत. मासेमारी हंगामाच्या प्रारंभालाच मासेमारी ठप्प झाली आहे. मोठ्या संख्येने नौका किनाऱ्यावर आल्याने स्थानिक सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे..समुद्रातील वातावरणात रविवारी (ता. २३) रात्रीपासून बदल जाणवण्यास सुरुवात झाली. सोमवारी (ता. २४) सकाळपासून लाटांच्या उंचीत वाढ होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या शेकडो नौका किनाऱ्याच्या दिशेने निघाल्या. आश्रयासाठी देवगड किनारा सुरक्षित मानला जात असल्याने दुपारनंतर शेकडो नौका किनाऱ्यावर थांबल्या. यामध्ये गुजरातसह विविध राज्यांतून आलेल्या नौकांचा समावेश आहे..Sindhudurg Heavy Rain: समुद्रात वादळी स्थिती, देवगडबंदरात शेकडो नौका आश्रयाला.दरम्यान, नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नौकाचालकांनी मत्स्य विभागाकडे नौका आश्रयाला उभ्या करण्यासाठी परवानगी मागितली होती. .Sindhudurg Heavy Rain: समुद्रात वादळी स्थिती, देवगडबंदरात शेकडो नौका आश्रयाला.त्यानुसार मत्स्य विभागाने त्यांना परवानगी दिली आहे. बाहेरून आलेल्या नौकांची मत्स्यव्यवसाय विभागाकडून नोंदणी व तपासणी सुरू आहे. समुद्रातील हवामान पूर्वपदावर आल्यानंतर या नौका पुन्हा समुद्रात जातील..राज्यातील यंदाच्या मासेमारी हंगामाचा नुकताच मुहूर्त झाला असतानाच समुद्रातील खराब हवामानामुळे मासेमारी ठप्प झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.